Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे आमच्या अंगाला भोके पडत नाही; अजित पवार यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर

आमच्या अंगाला भोके पडत नाही; अजित पवार यांचे संजय राऊतांना सडेतोड उत्तर

Subscribe

पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर खासदार संजय राऊत माध्यमांसमोरच थुंकले.  या प्रकरणी आता राजकारण तापताना दिसत आहे. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी प्रत्येकाने तारतम्य ठेवून बागण्याची भूमिका मांडल्यानंतर संजय राऊत यांनी त्यांच्यावर खालच्या पातळीवर टीका केली. यानंतर अजित पवार यांनी त्यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला भोके पडत नाही, असे वक्तव्य करत सडेतोड उत्तर दिले आहे. (Our body is not pierced, Ajit Pawar’s reply to Sanjay Raut)

गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्ष नेते अजित पवार आणि शिवसेना (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहेत. श्रीकांत शिंदे प्रकरणावरून पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांमध्ये वाद सुरू झाला आहे. अजित पवार चंद्रपूरचे दिवंगत खासदार बाळू धानोरकर यांच्या निवासस्थानी सांत्वनासाठी गेले होते. यानंतर माध्यमांनी त्यांनी संजय राऊतांच्या टीकेप्रकरणी प्रश्न विचारला असता त्यांनी आधी ‘नो कॉमेंट्स’ म्हटलं. पण नंतर त्यांनी संजय राऊत यांच्या बोलण्याने आमच्या अंगाला भोकं पडत नाहीत. आम्ही त्यांचा आदर करतो. त्यांना काय बोलायचे हा त्यांचा अधिकार असल्याचे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

काय आहे प्रकरण?
संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदेवर थुंकल्याप्रकरणी अजित पवार यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, कुठल्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी, प्रवक्त्यांनी, कार्यकर्त्यांनी आपली महाराष्ट्र संस्कृती आहे, परंपरा आहे, आपला काही इतिहास आहे, ती जपली पाहिजे. आपल्या सर्वांना स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सुसंकृत महाराष्ट्र कसा असू शकतो आणि कसा काम करू शकतो ते देशाला दाखवून दिलेले आहे. त्यामुळे प्रत्येकाने तारतम्य ठेवून वागावे एवढीच माझी भूमिका आहे. यानंतर संजय राऊत यांना अजित पवारांच्या विधानाबाबत विचारले असता त्यांनी खालच्या पातळीवर टीका केली. राऊत म्हणाले की, धरणामध्ये xxxपेक्षा थुंकणं चांगलं. ज्याचं जळतं त्याला कळतं. आम्ही भोगतो आहोत. आम्ही सगळं भोगूनही जमिनीवर उभे आहोत. मी माझ्या पक्षाबरोबर ठामपणे उभे आहे. आमच्या मनात पक्ष बदलण्याचा आणि संकटं येत आहेत म्हणून भाजपासारख्या पक्षाबरोबर सूत जुळवण्याचा आमचा विचार होत नाही, असेही संजय राऊत म्हणाले.

 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -