घरमहाराष्ट्रपुणेआपलाच पक्ष गरीबाच्या भाकरीची चिंता करतो...; फडणवीसांचा मविआला टोला

आपलाच पक्ष गरीबाच्या भाकरीची चिंता करतो…; फडणवीसांचा मविआला टोला

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला. यानंतर महाराष्ट्रातील राजकारणात भाकरीवरून राजकारण रंगले होते. यावर पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (devendra fadnvis) म्हणाले की, आपला एकच पक्ष गरीबाच्या भाकरीची चिंता करतो.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात आता नवीन सुरू झाले आहे. कोणी म्हणतं भाकरी फिरवतो, कुणी म्हणतं भाकरी करपवणार, तर कुणी म्हणतं भाकरी वाकडी होणार. एक पक्ष भाकरी फिरवणारा, दुसरा पक्ष भाकरीचे तुकडे करणारा आणि तिसरा पक्ष पूर्ण भाकरी हिसकावणारा, पण आपलाच पक्ष आहे जो गरीबाच्या भाकरीची चिंता करतो आहे. 48 कोटी गरीबांचे जनधन खाते, 10 कोटी उज्ज्वाला गॅस, शौचालय, शेतकरी सन्मान निधी, कोट्यावधी लोकांना घरे, कोट्यावधी आयुष्यमान भारत योजना, 20 कोटी कोविडच्या लसी, खरं म्हणजे लाभार्थीची बेरीज लावली तर आज या ठिकाणी ती बेरीजदेखील लावता येणार नाही, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

- Advertisement -

भाजपाच्या योजनांबद्दल दिली माहिती
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, केवळ 11 महिन्यामध्ये आपलं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर जे आपण जनविकासाचे निर्णय घेतले त्या निर्णयाच्या अभिनंदनाचा प्रस्ताव या ठिकाणी पास केला. नमो शेकरी सन्मान निधी 6 हजार रुपये आता मोदींसोबत आपलं सरकार देणार आहे. शेतकऱ्याला 12 हजार रुपये, 1 रुपयामध्ये पीक विमा, शेतकऱ्यांना सौर उर्जेच्या माध्यमातून 24×7 वीज देणार, जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून शेतीला पाणी देणार, महिलांना एसटीमध्ये 50 टक्के सवलत, लेक लाडकीच्या माध्यमातून घरी मुलगी झाली की ते घर लखपती होणार, महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या माध्यमातून 5 लाखांपर्यंत उपचार मोफत होणार, मोदी आवास अंतर्गत ओबीसींना 10 लाख घरे मिळणार, त्याच्याव्यतिरिक्त एसटी-एससीला 5 लाख घरे मिळणार, जर्नरला देखील 5 लाख घरे मिळणार, नदीजोड आणि सिंचनाचे प्रकल्प आम्ही करणार, रस्ते, रेल्व, स्वच्छ भारत अभियान आम्ही करणार, 14 मेडिकल कॉलेज सुरू करणार आणि समाजाच्या सर्व घटकांचे कल्याण करण्याकरता कल्याणकारी योजना देखील राबवणार असणार असल्याची माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -