घर महाराष्ट्र पुणे Prakash Ambedkar : संघाचा काळा इतिहास...; आंबेडकरांची RSSवर सडकून टीका

Prakash Ambedkar : संघाचा काळा इतिहास…; आंबेडकरांची RSSवर सडकून टीका

Subscribe

Prakash Ambedkar : ‘आरएसएस-भाजपाने (RSS BJP) पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला (Pakistan Independence Day) आणि भारताच्या स्वातंत्र्यदिनावर शोक व्यक्त केला होता, काळा दिवस पाळला होता. परंतु संघाचा हा काळा इतिहास कधीच पुसला जाणार नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी केली आहे. पुणे येथे पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Prakash Ambedkar Sanghs dark history Ambedkars scathing criticism of RSS)

हेही वाचा – Sharad Pawar : अजित पवारांना…; शरद पवार यांनी सांगितलं भेटीमागचं कारण

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, ‘आरएसएस आणि भाजपाने पाकिस्तानचा स्वातंत्र्यदिन साजरा केला होता. भारताच्या स्वातंत्र्यदिनावर शोक व्यक्त करताना काळा दिवस पाळला होता. दोघांनी भारतीय राष्ट्रध्वज, प्रतीक आणि लोकशाही-धर्मनिरपेक्ष संविधानाला कठोरपणे नाकारताना विषमतावादी मनुस्मृतीची मागणी केली होती, जी ते आजही करत आहेत. परंतु हा काळा इतिहास पुसण्याचे काम सध्या आरएसएस आणि भाजपाकडून सुरू आहे. पण कावळ्याने कितीही आंघोळ केली तरी तो बगळा होत नाही. संघाचा काळा इतिहास कधीच पुसला जाणार नाही. अशा शब्दात प्रकाश आंबेडकर यांनी आरएसएस आणि भाजपावर टीका केली आहे.

संघाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे लेखी माफीनामा दिला

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, नागपूरच्या बर्डी पोलीस स्टेशनमध्ये आरएसएस आणि भाजपाने पाकिस्तानचा स्वातंत्रदिन साजरा केल्याची नोंद झालेली आहे. याप्रकरणी संघाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्याकडे लेखी माफीनामा दिलेला आहे. धर्माच्या नावाखाली समाजाला दुभंगण्याचे काम त्यांनी केले आहे आणि आताही करत आहेत. परंतु सामान्य जनतेने यांना बळी पडू नये, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – तुम्ही गुपचूप भेटा, प्रेमाने भेटा…; शरद पवार-अजित पवार भेटीवर अमृता फडणवीसांचं विधान

आरएसएस-भाजपाने गोळवळकरांच्या पुस्तकाची जाहीर होळी करावी

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हेगडेवार, गोळवलकर, सावरकर आणि गोडसे हे विलक्षण लोक आता स्वतंत्र, धर्मनिरपेक्ष आणि लोकशाही भारताच्या प्रतिकांचा वापर करत आहेत. ज्यांना त्यांनी नाकारले होते आणि ते आजही नाकारत आहेत. त्यामुळे आरएसएस आणि भाजपाने गोळवळकरांच्या We or Our Nationhood Defined या पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाची जाहीर होळी केल्यास आम्ही मान्य करू की, ते बदलले आहेत, असे आवाहन त्यांनी संघ आणि भाजपाला केले.

आंबेडकरांनी अमित शाहांवर साधला निशाणा

आंबेडकर म्हणाले की, देशाचे गृहमंत्री अमित शाहा म्हणतात की, आम्ही स्वातंत्र्यानंतर जन्मलो, आम्ही तेव्हा नव्हतो. माझा त्यांना एकच प्रश्न आहे, त्यांनी संघाची हाफ चड्डी घालून हिटलरसारखा नमस्कार केला नाही हे जाहीर करावे, असे आवाहन करताना त्यांनी तुमच्या काळ्या इतिहासातील चुका आधी मान्य करा, असा टोलाही लगावला आहे.

- Advertisment -