घरमहाराष्ट्रपुणेPAKला गोपनीय माहिती पुरवली; DRDO संचालक डॉ. कुरुलकरची ATS कोठडी आज संपणार

PAKला गोपनीय माहिती पुरवली; DRDO संचालक डॉ. कुरुलकरची ATS कोठडी आज संपणार

Subscribe

पुणे : पुण्यातील डीआरडीओचे संचालक डॉ. प्रदीप कुरुलकर (Dr. Pradeep Kurulkar) यांची आज एटीएस कोठडी संपत असल्याने त्यांना आज पुणे सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्यांच्यावर देशाच्या संरक्षण क्षेत्रातील गोपनीय  माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. कुरुलकर यांनी कोणती माहिती पाकिस्तानला (Pakistan) दिली आणि कोणता तपास करायचा आहे, यांसदर्भात माहिती दहशतवाद विरोधी पथक (ATS) आज न्यायालयाला देणार आहे.

पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणांनी ऑक्टोबर महिन्यात डॉ. प्रदीप कुरुलकर यांच्यावर हनी ट्रॅपच जाळे टाकले. त्यासाठी पाकिस्तानने लंडनमधील मोबाईल नंबरचा वापर करून कुरुलकर यांच्याशी आधी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधला. संपर्क साधणाऱ्या महिलेने तीचे नाव झारा दास गुप्ता (बनावट नाव) सांगताना ती मूळची पश्चिम बंगालची असल्याचे सांगितले होते. फेसबुकवर सुरू झालेला संवाद व्हॉट्सअपपर्यंत पोहचला. यावेळी झाराने कुरुलकर यांच्या अतिशय खाजगी संवादापर्यंत पोहचला. यानंतर झाराने कुरुलकर यांना डीआरडीओकडून देशातील वेगवगेळ्या प्रयोगशाळांमध्ये सुरु असलेल्या संशोधनाबाबत तसेच ब्रम्होस क्षेपणास्त्राबद्दल माहिती विचारली जाऊ लागली. त्याचबारोबर भारत संरक्षण क्षेत्रात इतर कोणत्या देशांसोबत व्यवहार करत आहे याचीही महिती विचारली जात होती.

- Advertisement -

झारा आणि कुरुलकर यांच्यातील संभाषण देशाच्या गुप्तचर विभाग अर्थात आयबीच्या हाती लागले. झाराचा मोबाईल नंबर लंडनचा असला तरी इंटरनेटचा आयपी एड्रेस पाकिस्तानमधील होता. त्यामुळे आयबीने हे प्रकरण गांभीर्याने घेतले. फेब्रुवारी महिन्यात याबाबतची संपूर्ण माहिती पुराव्यानिशी मिळाल्यानंतर आणि डीआरडीओच्या दिल्लीतील  मुख्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती. त्यांनी तक्रारीत म्हटले की, प्रदीप कुरुलकर यांनी देशाची संवेदनशील गोपनीय माहिती भंग केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर पंतप्रधान आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार यांना याची कल्पना देण्यात आली. त्यानंतर या प्रकरणाचा तपास एटीएसकडे देण्याचा निर्णय झाला आणि एटीएसने अधिकृत गुप्त कायद्यांतर्गत डॉ. कुरूलकर यांना अटक केली होती. प्रकरण संवेदनशील असल्यामुळे एटीएससोबत रॉ आणि इतर गुप्तचर संस्थाही लक्ष ठेऊन आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -