घर महाराष्ट्र पुणे Maharashtra accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, चौघांचा मृत्यू

Maharashtra accident : पुणे-बंगळुरू महामार्गावर बस आणि ट्रकचा अपघात, चौघांचा मृत्यू

Subscribe

पुणे – बंगळुरू महामार्गावर एक मोठा भीषण अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. ही घटना आंबेगाव जवळील नऱ्हे येथील स्वामी नारायण मंदिराच्या येथे घडली आहे. खासगी बस आणि ट्रक यांच्यात धडक बसल्याने जागीच ४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १८ जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

अपघाताची माहिती मिळताच अग्निशमन दलाकडून पुणे महापालिकेची ४ वाहने, १ रेक्स्यु व्हॅन, पीएमआरडीकडून १ रेक्यु व्हॅन पाठवली गेली. मृत झालेल्या व्यक्तींमध्ये एका लहान मुलाचा सुद्धा समावेश आहे. घटनास्थळी पोहचलेल्या अग्निशामन दलाच्या अधिकाऱ्यांनी आणि जवानांनी बसच्या मागील काचा फोडून त्यात अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढले. तसेच पुढे अडकलेल्यांना सुद्धा त्यांनी बाहेर काढले. असे एकूण १८ जखमींना सुखरुप बाहेर काढण्यात आले.

हेही वाचा – राजकीय भूकंप झाल्यानंतर मला टेन्शन येतं, पंकजा मुंडेंचं मोठं वक्तव्य

- Advertisement -

पुणे-बंगळुरु महामार्गावर मध्यरात्री दोनच्या सुमारात कोल्हापूर येथून २५ जणांना घेऊन जाणारी एक ट्रॅव्हल बस मुंबईच्या दिशेने निघाली होती. याच दरम्यान मागून आलेल्या ट्रकने बसला धडक दिली. या धडकेच बस आणि ट्रक उलटले गेले. या अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, अपघात झालेली ही बस निता ट्रॅव्हल कंपनीची असल्याचे सांगण्यात आले आहे. तर मागून आलेला ट्रक हा साखरेची वाहतूक करत होता.

उत्तर प्रदेशातही झाला होता बसचा अपघात
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये बस आणि ट्रक यांची शुक्रवारी रात्री उशिरा जोरदार धडक झाली. लखनऊ-गोरखपूर महामार्गावर ४० प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या बसची ट्रकला धडक बसल्याने हा भीषण अपघात झाला. या अपघातात ७ जणांचा मृत्यू तर, ४० जण जखमी झाले होते.


हेही वाचा- विमानाच्या विंडशील्डला क्रॅक अन् वैमानिकाने दाखवले प्रसंगावधान; थोडक्यात अनर्थ टळला!

- Advertisment -