Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे Pune Chandni Chowk : पुणे भाजपामध्ये नाराजीनाट्य; मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या

Pune Chandni Chowk : पुणे भाजपामध्ये नाराजीनाट्य; मेधा कुलकर्णी स्पष्टच बोलल्या

Subscribe

Chandni Chowk flyover : पुण्यातील (Pune) चांदणी चौकचं (Chandni Chowk) उद्घाटन उद्या (12 ऑगस्ट) केंद्रीय रस्ते व महामार्ग विकासमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या हस्ते होणार आहे. यानिमित्ताने भाजपाकडून (BJP) पुण्यात मोठे होर्डींग लावण्यात आले आहेत. मात्र याच होर्डींगवर आता भाजपात नाराजीनाट्य सुरू झाले आहे. भाजपाच्या माजी नेत्या मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) यांनी ‘निराश’ असं ट्वीट करत उघडउघड नाराजी व्यक्त केली आहे. (Pune Chandni Chowk Anger in Pune BJP Medha Kulkarni spoke clearly)

मेधा कुलकर्णी यांनी ट्वीट करतना म्हटले की, माझ्यावरील कुरघोड्या, डावलणे याबद्दल मी कधी जाहीर वाच्यता केली नव्हती. मला विश्वासात न घेता अचानक निर्णय घेतले तेव्हाही नाही, पण आता दुःख मनात मावत नाही. त्यामुळे तुमच्याशी बोलावे वाटले. चांदणी चौक उद्घाटन कार्यक्रमाची कोथरूडमधील पत्रके पाहिली आणि खूप वाईट वाटले.

- Advertisement -

हेही वाचा – ‘शिवाई’ एसटीच्या ताफ्यात दाखल; नाशिक-पुणे मार्गावर धावणार ई-बस, ‘या’ आहेत सुविधा

चांदणी चौक या विषयाचे सर्वस्वी श्रेय नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांना आहे. पण मुळातच त्यांच्याकडे हा विषय नेला कोणी? स्वतः गडकरी यांनी काही वर्षांपूर्वी एका कार्यक्रमात जाहीर भाषणात म्हटले होते की, “तत्कालीन आमदार मेधा कुलकर्णी ताईंच्या सांगण्यावरून मी हा मुद्दा घेतला”. असे अनेक संदर्भ देता येतील की, ज्यात ‘कोथरूडचे आधुनिक कुठलेच नेते’ याविषयी सहभागी नव्हते, तेव्हापासून सतत पाठपुरावा केला होता. आता मात्र सर्व श्रेय एकट्याचेच असल्यासारखे वागणारे कोथरूडचे सध्याचे नेते माझ्या सारख्यांचे अस्तित्वच मिटवून टाकण्याच्या प्रयत्नात आहेत का? असा प्रश्न मेधा कुलकर्णी यांच्याकडून उपस्थित करण्यात आला आहे.

- Advertisement -

मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, मध्यंतरी मोदी आणि अमित शाहा पुण्यात येऊन गेले. ठराविक लोकांना प्रोटोकॉल सोडून ‘सर्व ठिकाणी’ पास होते. मी राष्ट्रीय पदावर असून विनंती करूनही मला पास दिला नाही. साधे कोथरूडच्या मंडल अध्यक्ष पदाच्या प्रक्रियेतही समाविष्ट श्रेणीमध्ये मी अपेक्षित नसेन तर, याचा अर्थ स्थानिकांना मी नको आहे. गेली अनेक वर्षे मी हे सहन करत आहे. त्या-त्या वेळी गोष्टी वरीष्ठांपुढे मांडल्या आहेत.

देशापुढील आव्हाने, त्यासाठी करायचे अपेक्षित संघटन सोडून, तसेच मोदीजींचे हात बळकट करण्यासाठी एकदिलाने कार्य करायचे सोडून, हे स्वतःच्या स्वार्थासाठी विघटनाचे, काटाकाटीचे राजकारण करत आहेत. माझ्या सारख्या निष्ठावान कार्यकर्तीला जाणीव झाली की, माझी काही किंमत नाही आहे.

हेही वाचा – पुणे रिंगरोडचे काम आता कुठल्याही कारणामुळे रखडणार नाही – अजित पवार

माझ्या बाबत त्यांना असे करणे सोपे जाते. माझ्याकडे ना मसल पॉवर, ना मनी पॉवर. मी एका सामान्य कुटुंबातून आलेली. विचारधारा धरून निष्ठेने काम करणारी कार्यकर्ती आहे. एका वैचारिकतेतून राजकारणात प्रवेश केला आणि अगदी मनापासून सर्व समाजातील लोकांची कामे केली. आजही जे सोपवले आहे ते करतच आहे. त्यावर असा बोळा फिरवला जातो आहे, हे आता मात्र असह्य होऊन गेले आहे. अशी पोस्ट लिहिताना मेधा कुलकर्णी यांनी जाहीरपणे आपली नारीज बोलून दाखवली आहे. उद्घाटन कार्यक्रमामध्ये चंद्राकांत पाटील यांचा फोटो असल्यामुळे त्यांच्याविरोधात त्यांनी ही पोस्ट लिहिली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisment -