घरमहाराष्ट्रपुणेPune Constituency : ...भाजपाला जागा दाखवून देण्याची आम्हाला गॅरंटी - रवींद्र धंगेकर

Pune Constituency : …भाजपाला जागा दाखवून देण्याची आम्हाला गॅरंटी – रवींद्र धंगेकर

Subscribe

पुणे : लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊन पाच दिवस झाले तरी महाविकास आघाडीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. असे असले तरी काँग्रेसने आज (21 मार्च) आज आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. यात महाराष्ट्रातील 7 उमेदवारांचा समावेश आहे. काँग्रेसने पुणे मतदारसंघातून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर त्यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. (Pune Constituency We are guaranteed to show seat to BJP Ravindra Dhangekar)

हेही वाचा – LokSabha Election : भाजपाकडून उमेदवारांची तिसरी यादी जाहीर, अन्नामलाई यांच्यासह या नेत्यांचा समावेश

- Advertisement -

माध्यमांशी बोलताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, माझ्यासारख्या अतिशय सर्वसामान्य कार्यकर्त्याला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली. याबद्दल मी काँग्रेस पक्षाचा आणि सर्व वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचा आभारी आहे. मी पुणेकरांचा उमेदवार आहे. त्यामुळे याआधी मला पुणेकरांनी भरभरून आशीर्वाद दिला आहे. आता याही निवडणुकीत पुणेकर मला भरभरून आशीर्वाद देतील, याची मला खात्री आहे.

वाहतुकीपासून प्रदूषणापर्यंत अमली पदार्थांपासून वाढत्या गुन्हेगारीपर्यंत अनेक समस्या पुणेकरांसमोर उभ्या आहेत. महागाई, बेरोजगारी या समस्या तर दिवसेंदिवस वाढत आहेत. पण, भाजपाने या प्रश्नांबद्दल काहीही केले नाही. गेली 10 वर्षे पुण्यात भाजपाचे प्रतिनिधी आहेत. त्यांनी पुणेकरांच्या प्रश्नांबाबत कधी आवाज उठवला नाही. एकूणच राज्यात आणि देशात भाजपाच्या कारभाराला, फसवणुकीला जनता कंटाळली आहे. त्यामुळे ती या निवडणुकीत काँग्रेसला बहुमताने निवडून आणून भाजपाला आपली जागा दाखवून देईल, याची आम्हाला गॅरंटी आहे, असा विश्वास रवींद्र धंगेकर यांनी व्यक्त केला.

- Advertisement -

हेही वाचा – Praniti Shinde : गावबंदी करण्यापेक्षा भाजपाच्या नेत्यांना घरबंदी करा; प्रणिती शिंदेंचे मराठा समाजाला आवाहन

महाराष्ट्रातून काँग्रेसकडून 7 उमेदवारांना संधी

दरम्यान, 2014च्या मोदी लाटेत काँग्रेसला महाराष्ट्रात अवघ्या दोन जागा मिळाल्या, पण 2019मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था आणखीच दयनीय झाली. पक्षाला केवळ एक जागेवर समाधान मानावे लागले. म्हणूनच आता काँग्रेस खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रेचा लाभ घेण्याबरोबरच निवडणुकीच्या रिंगणात तगडे उमेदवार उतरविण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे. याचपार्श्वभूमी काँग्रेसने कोल्हापूर मतदार संघातून शाहू महाराज, पुण्यातून रवींद्र धंगेकर, नंदुरबारमधून गोवाल पाडवी, सोलापूरमधून प्रणिती शिंदे, लातूरमधून शिवाजी कालगे, नांदेडमधून वसंत चव्हाण आणि अमरावतीमधून बळवंत वानखेडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -