घरमहाराष्ट्रपुणेPune Crime: डोक्यात खुर्ची घालत बेदम मारहाण; पुण्यात पोटच्या लेकाकडून जन्मदात्रीला नरक...

Pune Crime: डोक्यात खुर्ची घालत बेदम मारहाण; पुण्यात पोटच्या लेकाकडून जन्मदात्रीला नरक यातना

Subscribe

पुणे: आई आणि मुलाचं नातं जगातील सर्वात पवित्र नातं मानलं जातं. पण पुण्यातील पोटच्या मुलानं आपल्या जन्मदात्रीच्या डोक्यात खुर्ची घालत मारहाण केली आहे. घर नावावर करून देत नसल्यानं त्याने हे कृत्य केल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकरणी आता चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Pune Crime Beating up with a chair on the head In Pune a woman is tortured to death by her Son)

याप्रकरणी मुलगा कपिल दीपक सकट, त्याची पत्नी पायल कपिल सकट (वय, 26) याच्यासह सासू आणि मेहुण्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी आता यशोदा दीपक सकट यांनी चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

- Advertisement -

नेमकं काय घडलं?

यशोदा सकट यांचा मुलगा कपिल, त्याची पत्नी पायल, तिची आई आणि मेहुणा राहते घर नावावर करुन देण्यासाठी त्रास देत होते. दोन दिवसांपूर्वी कपिल आणि त्याची आई यशोदा यांच्यात घरावरून वाद झाला होता. यावेळी त्याने आपल्या आईच्या डोक्यात खुर्ची मारत तिला शिवीगाळ केली. या घटनेत त्यांना दुखापतही झाली. या प्रकरणी आता यशोदा यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. याप्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करत आहेत.

(हेही वाचा: Ashish Shelar : आधी त्यांनी युद्धाला तलवार उचलली होती…, ठाकरे गटावर आशिष शेलारांचा निशाणा)

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -