घरमहाराष्ट्रपुणेPune Crime : मैत्रिणीनेच गंडवले! 80 लाखांचे कर्ज नावावर घेऊन केली फसवणूक

Pune Crime : मैत्रिणीनेच गंडवले! 80 लाखांचे कर्ज नावावर घेऊन केली फसवणूक

Subscribe

पुणे : सध्या फसवणुकीच्या घटनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आपल्या आजूबाजूचे लोक आपली फसवणूक करण्याच्या घटना वाढल्यामुळे कोणावर विश्वास ठेवायचा हा प्रश्न उपस्थित होत आहे. कारण पुण्यामध्ये एका मैत्रिणीने तिच्या मैत्रिणीच्या विश्वासाचा गैरफायदा घेत फसवल्याची घटना उघडकीस आली आहे. मैत्रिणीच्या नावावर तब्बल 80 लाखांचे कर्ज घेत काही रक्कम फेडली, मात्र उर्वरीत देण्यास टाळाटाळ करत फसवणूक केली आहे. या प्रकरणी एका महिलेसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध बिबवेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तक्रारदार महिला बँकेत कामाला असून ती आणि आरोपी कल्याणी लोणकर एकाच सोसायटीत राहत असून दोघी चांगल्या मैत्रिणी आहेत. कल्याणीने तक्रार महिलेला मोठी आर्थिक अडचण निर्माण झाल्याचे सांगून तातडीने पैश्यांची गरज असल्याचे सांगितले. तसेच तिने तुझ्या नावावर बँकेतून कर्ज काढ. मी दरमहा नियमित हप्ता भरेन, असे कल्याणीने तिला सांगितले. मात्र, बँकेकडून एवढे कर्ज मिळणार नसल्याचे तक्रारदार महिलेने सांगितल्यानंतर कल्याणीने उत्तम शेळके नावाच्या एका व्यक्तीशी तक्रारदार महिलेची ओळख करुन दिली.

- Advertisement -

तिने सांगितले उत्तम शेळके बँकेतील कर्ज प्रकरणे मंजूर करण्याचे काम करतो, असे सांगून तिने तक्रारदार महिलेला कर्ज मंजुरीसाठी शेळकेला कागदपत्रे देण्यास भाग पाडले. त्या कागदपत्रांचा गैरवापर करुन आरोपी कल्याणीने तक्रारदार महिलेच्या नावावर तब्बल 80 लाख रुपयांचे कर्ज घेतले. या कर्जाचे 48 लाख 4 हजार रुपये कल्याणीने फेडले. पण उरलेले हप्ते न भरल्यामुळे तक्रारदार महिलेला दर महिन्याला 1 लाख 70 हजार रुपये हप्ता भरावा लागत होता.

तक्रारदार महिलेने आरोपी कल्याणीला पैसे भरण्यास सांगितले असता तिने टाळाटाळ केली आणि माझे काका शहरातील एका पोलीस स्टेशनमध्ये कामाला आहेत. त्यांना सांगेन अशी धमकी कल्याणीने दिली. याशिवाय तक्रारदार महिला कल्याणीच्या घरी गेल्यावर तिच्या आई-वडिलांनी महिलेला मारहाण केली. त्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून या प्रकरणी पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -