घरमहाराष्ट्रपुणेपुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेची बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 15 विद्यार्थी...

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेची बस 20 फूट खोल दरीत कोसळली, 15 विद्यार्थी जखमी

Subscribe

पुणे : पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेच्या बसचा रायगडमध्ये भीषण अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. ही बस 15 ते 20 फूट खोल दरीत कोसळली. ज्यात 15 विद्यार्थी जखमी झाले आहेत. माणगाव रायगड रस्त्यावरील घरोशी वाडी येथे हा अपघात झाल आहे. सहलीसाठी आलेली बस घरोशी वाडीतील दरीत कोसळली. या घटनेत 15 विद्यार्थी जखमी झाले असून यातील दोघांची प्रकृती गंभीर आहे. त्यांना पुढील उपचारांसाठी आता मुंबईला हलवण्यात आले आहे. तर इतर जखमींना उपचारांसाठी पाचाड ग्रामीण आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहेत.

पुण्यातील ज्ञान प्रबोधिनी शाळेतील विद्यार्थ्यांची सहलकिल्ले रायगडाच्या रस्त्यावर असताना हा अपघात झाला. या अपघातामागील नेमकं कारण अद्याप समोर आलं नाही. दरम्यान पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तात्काळ तपास सुरु केला आहे.


ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का; खासदार गजानन कीर्तिकरांचा शिंदे गटात प्रवेश

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -