घर महाराष्ट्र पुणे धक्कादायक: तीन हजारांसाठी पत्नीचा सौदा; मित्रांसोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग

धक्कादायक: तीन हजारांसाठी पत्नीचा सौदा; मित्रांसोबत संबंध ठेवण्यास पाडले भाग

Subscribe

तीन हजारांसाठी पतीने आपल्या पत्नीला मित्रांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

पुणे: मागच्या काही दिवसांपासून पुण्यातील गुन्हेगारीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. पुणे शहरातून हाणामारी, खून, अपहरण, गुंडागर्दी अशा बातम्या येत असतात. आता पुन्हा एकदा पुणे शहरातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. तीन हजारांसाठी पतीने आपल्या पत्नीला मित्रांना विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. Pune Hadapasar Area Shocking husband bargain his wife for three thousand Forced relationships with friends pup

शहरातील हडपसर परिसरातून एक धक्कादायक घटना घडली. पतीने आपल्या पत्नीला केवळ तीन हजारांसाठी आपल्या मित्राला विकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकचं नाही तर पतीने आपल्या पत्नीला पैशासाठी जबरदस्तीने वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. 25 वर्षीय विवाहित महिलेने याप्रकरणी तक्रार दिली आहे. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरुन आता पतीसह त्याच्या दोन मित्रांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, फिर्यादी महिलेच्या पतीला पैशाची आवश्यकता होती. त्यामुळे पैशाची गरज भागवण्यासाठी त्याने आपल्या पत्नीला मारहाण करत उंड्री हांडेवाडी रस्त्यावर उभे करुन वेश्याव्यवसाय करण्यास भाग पाडले. पत्नीची इच्छा नसतानाही मित्रांसोबत तिला शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. डिसेंबर 2020 पासून हा संपूर्ण प्रकार सुरु असल्याचे पत्नीने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

( हेही वाचा: सुसंस्कृत ठाणे गुंडांचे ठाणे झालं; उद्धव ठाकरेंचा शिंदे-फडणवीस सरकारवर हल्लाबोल )

शिवीगाळ करत दिली धमकी

- Advertisement -

पीडित महिला ही दोन दिवसांपूर्वी रास्ता पेठ परिसरातून जात असताना तिच्या पतीच्या मित्रांनी तिला अडवत जातीवाचक शिवीगाळ करत तिला मारण्याची धमकी दिली. एवढेच नाही तर तिला पुन्हा शारिरिक संबंध ठेवण्याची मागणी केली. पीडित महिलेने त्यांना नकार दिला त्यामुळे त्यांनी तिला मारहाण केली. या संपूर्ण प्रकारानंतर फिर्यादीने पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. पोलिसांनी देखील या घटनेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस आयुक्त देसाई करत आहेत.

( हेही वाचा :वाझेमागे लाळ घोटतात त्यांना बोलण्याचा अधिकार काय?, देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर पलटवार )

- Advertisment -