घरमहाराष्ट्रपुणेPune Murder: माता न तू वैरिणी: पुण्यात आईनेच 4 वर्षीय मुलीची चाकूने...

Pune Murder: माता न तू वैरिणी: पुण्यात आईनेच 4 वर्षीय मुलीची चाकूने भोसकून केली हत्या

Subscribe

पुण्यातील हडपसर भागात आईनेच आपल्या 4 वर्षीय चिमुरडीला चाकूने भोसकून मारल्याचे उघड झाले आहे. सोमवारी रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली.

पुण्यात गुन्हेगारीच्या घटना वाढतच चालल्या आहेत. पुण्यात मारहाण, हत्या आणि अपहरणाच्या बातम्या समोर येत असतात. आता पुण्यातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील हडपसर भागात आईनेच आपल्या 4 वर्षीय चिमुरडीला चाकूने भोसकून मारल्याचे उघड झाले आहे. सोमवारी रात्री 9:30 च्या सुमारास ही घटना घडली. आईनेच आपल्या मुलीची हत्या का केली? याचे कारण मात्र अद्याप समजून शकले नाही.

वैष्णवी महेश वाडेर ( वय 4) असे खून करण्यात आलेल्या चिमुरडीचे नाव आहे. या प्रकरणी मुलीची आई कल्पना वाडेर हिला पोलिसांनी अटक केली आहे. हडपसर येथील सिद्धीविनायक दुर्वांकर सोसायटी ससाणे नगर येथे ही घटना घडली आहे. आरोपी कल्पना आणि तिची चार वर्षांची मुलगी या दोघीच राहत होत्या. कल्पना यांनी मुलीचा खून कोणत्या कारणावरुन केला, याचे कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे.

- Advertisement -

‘असा’ उघडकीस आला प्रकार

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या महिन्यात हे दोघे पुण्यातील हडपसर येथील सिद्धीविनायक दुर्वांकर सोसायटी ससाणे नगर येथे वास्तव्यास आले होते. आरोपी महिला ही बेकरी प्राॅडक्ट विक्री करुन आपली गुजराण करत होती. कल्पना सोमवारी भाड्याचे घर खाली करणार होती. त्यामुळे घरमालक आणि शेजा-यांनी आत जाऊन पाहिले असता मुलीचा मृतदेह आढळून आला. यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली . यावर हडपसर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत महिलेला ताब्यत घेतला आहे. या हत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.

( हेही वाचा: एन्काउंटर स्पेशालिस्ट दया नायक पुन्हा मुंबई पोलीस दलात, ‘या’ अधिकाऱ्यांचीही बदली )

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -