Homeमहाराष्ट्रपुणेSharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेला कोण आहे...

Sharad Mohol Case : शरद मोहोळ खून प्रकरणात अटक केलेला कोण आहे विठ्ठल शेलार?

Subscribe

पुणे :  गँगस्टर शरद मोहोळ यांचा खून केल्याप्रकरणातील मास्टर माईंड चा चेहरा समोर आणण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. पुणे पोलिसांनी 10 जणांना पनवेल आणि वाशीमधून अटक केली आहे. शरद मोहोळची 5 जानेवारी रोजी पुण्यात गोळ्या घालून हत्या झाली होती. यानंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. आतापर्यंत 24 जणांवर पोलिसांनी कारवाई केली असून, 15 जणांना अटकही करण्यात आली आहे. पोलिसांनी मुळशी तालुक्यातील गुंड विठ्ठल शेलारसह दोघांना पनवेलमध्ये अटक केली आहे. या प्रकराणामध्ये आणखी काही आरोपी आमच्या रडारवर असून लवकरच त्यांना अटक केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

अटक केलेल्या सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. काल हिंदुत्तवादी संघटानांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये त्यांनी शरद मोहोळची पाठराख केली, त्याचप्रमाणे तो गोरक्षक असल्याचा दावा देखील करण्यात आला आहे. त्याचप्रामाणे त्याच्या हत्येचा NIA कडे तपास करण्याची मागणी केली आहे. यानंतर विठ्ठल शेलार यांना अटक करण्यात आली. विठ्ठल शेलार याचा भाजपशी संबंध असून त्यांच्यात कनेक्शन आहे का? अशी चर्चा सध्या सुरू आहे.

कोण आहे विठ्ठल शेलार?

शरद मोहोळच्या हत्येप्रकरणी भाजपशीच संबंधित विठ्ठल शेलारला अटक करण्यात आली. विठ्ठल शेलार हा मुळशी तालुक्यामधील उरवडे गावचा रहिवासी आहे. विठ्ठल शेलारला हत्या, हत्येचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्ह्यांमधून जामीन मिळत गेले. त्याच्यावर खून, खूनाचा प्रयत्न, अपहरण आणि खंडणीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. 2014 मध्ये त्याच्यावर मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता त्याचप्रमाणे त्याला अटक देखील करण्यात आली होती. 2017 मध्ये त्याची जामीनावर सुटका करण्यात आली होती. त्यानंतर काहीच दिवसांत त्याने भाजपात प्रवेश केला. यावर गिरीश बापट म्हणाले होते की, आम्हाला विठ्ठल शेलारच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीची माहिती नव्हती. आम्ही त्याच्यावर कारवाई करू. असं बापट म्हणाले.