घरमहाराष्ट्रपुणेमी सुशिक्षित गुंड आहे, रवीकिरण इंगवलेंना राजेश क्षीरसागरांचा इशारा

मी सुशिक्षित गुंड आहे, रवीकिरण इंगवलेंना राजेश क्षीरसागरांचा इशारा

Subscribe

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात उलथापालथ होत आहे. यानिमित्ताने शिवसेनेतील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत. याचीच परिणती कोल्हापुरात दिसत असून येथे बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर आणि शिवसेनेचे माजी शहरप्रमुख रवीकिरण इंगवले यांच्यातील वाद पुन्हा समोर आला आहे. इंगवले यांनी कोल्हापुरात काढलेल्या मोर्चादरम्यान राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर फाडल्यानंतर क्षीरसागर यांनी इंगवलेंना उघड धमकी दिली आहे.

एकनाथ शिंदेंसोबत असणाऱ्या बंडखोर आमदारांच्या विरोधात सध्या शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. ठिकठिकाणी या आमदारांच्या निषेधात मोर्चे काढले जात आहेत. कोल्हापुरात बंडखोर शिवसेना नेते राजेश क्षीरसागर यांचे पोस्टर शिवसेना कार्यकर्त्यांनी काढलेल्या मोर्चादरम्यान फाडण्यात आले. यावरून आता क्षीरसागर आणि इंगवले यांच्यात जुंपली आहे.

- Advertisement -

इंगवलेंचा काय आरोप –

इंगवलेंनी या मोर्चादरम्यान क्षीरसागर यांच्यावर टीका करताना शिवसेनेच्या नावावर जोगवा मागून प्रचंड माया कमावल्याचा आरोप केला. शिवसेनेनं त्यांना वैभ देऊन देखील त्यांनी गद्दारी केली, असे इंगवले म्हणाले. या पार्श्वभूमीवर एका व्हिडीओच्या माध्यमातून राजेश क्षीरसागर यांनी थेट धमकीच दिली आहे.

- Advertisement -

क्षीरसागर काय म्हणाले –

बिलकुल दम नसणारा हा गुंड गैरफायदा घेऊन माझे पोस्टर फाडण्याचा प्रयत्न करत आहे. त्याला मी इशारा देतो की तू गुंड असशील तर मी सुशिक्षित गुंड आहे. रेकॉर्डिंग-रेकॉर्डिंगचे खेळ बंद कर. हे बाकीचे खेळ बंद कर. माझ्यासारखा सुशिक्षित गुंड बाहेर पडला तर तुला पळता भुई थोडी केल्याशिवाय राहणार नाही. वैयक्तिक द्वेषाचा फायदा कुणी घेत असेल, शिवसेनेचे नुकसान होत असेल तर यांना पाठिशी घालू नका. शिवसेना मी सोडलेली नाही. आम्ही अजूनही शिवसेनेतच आहोत. हा एकनाथ शिंदेंचा पठ्ठा आहे. तुला सोडणार नाही मी एवढं लक्षात ठेव, असे क्षीरसागर म्हणाले आहेत.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -