Thursday, June 8, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र पुणे शरद पवारांनी बाजूला होण्याचा निर्णय घेणे, ही पक्षाची हानी - जयंत पाटील

शरद पवारांनी बाजूला होण्याचा निर्णय घेणे, ही पक्षाची हानी – जयंत पाटील

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी काल मंगळवारी (ता. 5 मे) ‘माझे सांगाती… राजकीय आत्मकथा’ या पुस्तकाचे प्रकाशन केले. पण यावेळी शरद पवार यांनी अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतल्यानंतर कार्यक्रमस्थळी कार्यकर्ते, पदाधिकारी, आमदार, खासदार यांनी एकच गोंधळ घालत पवार यांना निर्णय मागे घेण्याची मागणी केली. या संदर्भात बोलताना जयंत पाटील म्हणाले की, शरद पवारांनी बाजूला होण्याचा निर्णय घेणे, पक्षाची हानी आहे. असे वक्तव्य त्यांनी माध्यमांशी बोलताना केले.

जयंत पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या नेतृत्वामुळे पक्ष देशात वाढला आहे. वेगवेगळ्या देशातले कार्यकर्ते त्यांच्यामुळे, त्यांच्या नावामुळे जोडले गेले आहेत. त्यामुळे पवार साहेब बाजूला जाणे पक्षाची हानी आहे. याबद्दल महाराष्ट्रातल्या देशातल्या कोणत्याही कार्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार येऊ शकत नाही. त्यांनी स्वत:हून निर्णय घोषित केला. आम्ही सगळे त्यांना सांगतो आहे, हा निर्णय योग्य नाही, हा निर्णय बदलावा. त्या प्रयत्नात मी नाही तर महाराष्ट्रातले सगळेच कार्यकर्ते आहेत.

- Advertisement -

सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वावर उत्तर देणे टाळले
शरद पवार यांचे नेतृत्व बाजूला जाऊ नये ही आमची भूमिका आहे. त्यानंतर निर्माण होणाऱ्या प्रश्नांना उत्तर आज देण्याची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. असे बोलून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वावर उत्तर देणे टाळले. 2024 ला लोकसभा, विधानसभा निवणूका होणरा आहेत. फक्त दीड वर्षाचा कालावधी राहिलेला आहे. दीड वर्षाचा कालावधी म्हटला तर छोटा आहे, त्यामुळे सर्वांनाच वाटते की, ही व्यवस्था 2024 पर्यंत चालू राहावी, असे ते म्हणाले.

आम्हाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता मिळणार
जयंत पाटील म्हणाले की,  मुनगंटीवारांचा राष्ट्रवादीबद्दल बोलताना वारंवार तोल का जातो, हेच मला समजत नाही. मुद्दे उपस्थित करून राजकारण होत नसते. राजकारण लोकांच्या, समाजाच्या मनावर आणि मानन्यावर असते. सुधीर मुनगंटीवारांची मी काही विधान गेल्या चार दिवसात बघतो आहे. त्या विधानामध्ये त्यांच्या मनात राष्ट्रवादीबद्दल प्रचंड तिरस्कार दिसतो आहे. ते चुकीची विधान करत आहेत. ते राज्याचे जबाबदार मंत्री आहेत आणि पक्षामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. राज्यात आणि देशातल्या वेगवेगळ्या भागात शरद पवारांना माननारे कार्यकर्ते आणि नेते आहेत. त्या सगळ्यांनी मिळून पुन्हा प्रयत्न केल्यावर राष्ट्रीय पक्ष म्हणून आम्हाला मान्यता मिळणार आहे. कर्नाटकमध्ये आम्ही निवडणूका लढवत आहोत. त्यामुळे राष्ट्रीय पक्ष होणे आणि त्याची मान्यता मिळणे हे औपचारीकता आहे. आपल्या देशातल्या सगळ्याच नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार अध्यक्ष असावे, अशी भूमिका घेतली आहे आणि आजही आहे. पवार साहेबांनी राजिनामा दिला आहे. त्याच्यावर योग्य ती चर्चा त्यांनी जी समिती नेमलेली आहे ती समिती करेल, असेही जयंत पाटील म्हणाले.

- Advertisement -

वज्रमूठ सभेच्या तारखेत बदल
सध्या उन्हाचे वाढते तापमान पाहता वज्रमूठ सभेच्या तारखेत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. 1 तारखेच्या सभेनंतर झालेल्या  बैठकीत उद्धव ठाकरे, अजित पवार, अशोक चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, नाना पटोले आणि मी निर्णय घेतला की, वज्रमूठ सभेच्या तारखा बदलायच्या आणि काही सभा पुढे न्यायचा असा निर्णय घेतला आहे.

- Advertisment -