घरमहाराष्ट्रपुणे...तर मी राजकारण सोडेन; शिंदे गटातील खासदाराच्या आरोपाला अजित पवारांचे प्रत्युत्तर

…तर मी राजकारण सोडेन; शिंदे गटातील खासदाराच्या आरोपाला अजित पवारांचे प्रत्युत्तर

Subscribe

पुणे : शिंदे गटातील खासदाराने अजित पवार अर्थमंत्री असताना खोके घेऊन काम करत असल्याचा आरोप केला आहे. याप्रकरणी अजित पवार यांना पत्रकार परिषदेत प्रश्न विचारला असता, ते म्हणाले की, महाराष्ट्रातील एकाही व्यक्तीने सांगितले की मी खोके घेऊन काम करत होतो तर मी राजकारण सोडेन. (…so I quit politics; Ajit Pawar’s response to Shinde group MP’s allegation)

अजित पवार म्हणाले की, कृपाल तुमाने यांनी केलेल्या आरोपावर महाराष्ट्रातील एका व्यक्तीने सांगितले, तर मी राजकारण सोडेन आणि जर कृपाल तुमाने या खासदाने मी खोके देत होतो हे सिद्ध करून नाही दाखवले तर त्याने उद्यापासून घरी बसावे. यावेळी अजित पवार यांनी सज्जड दम भरला की, असला आरोप माझ्यावर करायचा नाही. उद्या सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदारांना तुम्ही खासगीत विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ती. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला. त्या माणसाला माझ जाहीर आवाहान आहे. त्याने एका माणसाला माझ्यासमोर उभ करावं आणि सांगावे अजित पवारांना पैसे दिल्यावर त्याचे अर्थमंत्रालयातील काम झाले, असे अजित पवार म्हणाले.

- Advertisement -

खोके बघणारे लोक खोक्याबद्दलच बोलतात
नागपुरात प्रसारमाध्यमांनी अजित पवारांबद्दल प्रश्न विचारला असता कृपाल तुमाने यांनी गंभीर आरोप केला आहे. ते म्हणाले की, अजित पवार यांनी वित्तमंत्री असताना त्यांनी किती खोके जमवले हे सांगावे. खोक्याशिवाय ते कामच करत नव्हते. झोपताना आणि झोपून उठल्यावर खोके बघणारे लोक खोक्याबद्दलच बोलतात.

अजित पवार काय म्हणाले होते?
राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का लागत नाही, असा प्रश्न विचारला असताना अजित पवार म्हणाले होते की, गद्दारीला वर्ष होईल. निवडणुका घेण्यापासून त्यांना कुणी अडवले? हा प्रश्न उपस्थित करत ते म्हणाले की, काय होईल ही धास्ती त्यांना वाटत आहे. विधानपरिषदेत राज्यकर्त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे. राज्य सरकारविरुद्ध लोकांमध्ये असलेली खदखद एकदिवस नक्कीच बाहेर येईल आणि शिवसेनेतील गद्दारांना धडा शिकवेल. यासाठी पन्नास खोके एकदम ओके हे तुम्हालाही विसरायचे नाही, असा सल्लाही अजित पवार यांनी महाराष्ट्रातील जनतेला दिला होता.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -