घरमहाराष्ट्रपुणेशेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी फेरलं; आंबेगावात ढगफुटीसदृश्य पाऊस

शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी फेरलं; आंबेगावात ढगफुटीसदृश्य पाऊस

Subscribe

आज आंबेगावात भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतरी अडचणीत सापडला आहे.

पुणे : यंदा राज्यात उशिराने मान्सून दाखल झाला होता. त्यामुळे शेतकरी चिंतित झाले होते. त्यानंतर झालेल्या पावसानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या खरी परंतू त्यांनातर पावसाने उघडीप दिली होती. आता राज्यातील काही भागात जोरदार पाऊस बरसत आहे. याच दरम्यान पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात 21 सप्टेंबर रोजी पावसाने जोरदार हजेरी लावली. आंबेगाव तालुक्यातील काठापूर गाव आणि परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला. त्यामुळे परिसरातील शेतपिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांच्या हिरव्या स्वप्नांवर पाणी फेरल्याचे दिसून आले. (The green dreams of the farmers have been watered down Cloudburst-like rain in Ambegaon)

आज आंबेगावात भागात झालेल्या ढगफुटीसदृश्य पावसामुळे शेतरी अडचणीत सापडला आहे. झालेल्या पावसामुळे ओढ्यांना पूर आल्याने अनेक शेतकरी अद्यापही पुरात अडकल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या आठ ते दहा वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस काठापूरमध्ये बरसल्याची माहितीही समोर आली आहे.

- Advertisement -

तब्बल तीन तास बरसला पाऊस

उघडीप दिलेल्या पावसाने आज आंबेगाव तालुक्यात जोरदार एंट्री केली. गुरुवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास सुरू झालेला पाऊस तब्बल सायंकाळी साडेसहा पर्यंत सुरू होता. मुसळधार पावसाने शेतातील उभी पिके भुईसपाट केली असून अनेक शेतीचे बांध फुटले आहेत. त्यामुळे येथील शेतीचे नुकसान झाले आहे.

हेही वाचा : मीडिया टायकून RUPERT MURDOCH यांनी फॉक्सच्या अध्यक्षपदाचा दिला राजीनामा; ‘इतक्या’ दशकांनंतर सोडले पद?

- Advertisement -

हातातोंडाशी आलेला घास हिरावला

पावसाळा सुरू झाल्यापासून पावसाच्या प्रतीक्षेत असणाऱ्या शेतकऱ्यांना झालेल्या पावसाने मोठ्या प्रमाणात दिलासा मिळाला आहे. शेतकरी वर्ग पावसाच्या आगमनाने समाधानी आहे. परंतु, शेती पिकांचे झालेले नुकसान तसेच शेतीचे झालेले नुकसान हे मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे. मागील वर्षातील सगळ्यात मोठा पाऊस काठापूर मध्ये झाला झाल्याचे माजी उपसरपंच विशाल करंडे यांनी सांगितले.

हेही वाचा : पुरोगामीत्वाला काळीमा: जादूटोण्याच्या संशयावरून जमावाने महिलेला खाऊ घातली स्मशानातील राख

विदर्भातही पावसाचा कहर

विदर्भातील चंद्रपूर जिल्ह्यात देखील अशाच प्रकारचा पाऊस झाला. चंद्रपूरमध्ये ढगफुटीसदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांच्या घरात पाणी घुसले होते. कमरे इतके पाणी चंद्रपूरमध्ये साचले होते. राज्यातील शेतकरी मात्र चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -