घर महाराष्ट्र पुणे पुण्यातील लोणी काळभोर ऑइल डेपोतून पेट्रोल डिझेलची चोरी, 10 जणांना अटक

पुण्यातील लोणी काळभोर ऑइल डेपोतून पेट्रोल डिझेलची चोरी, 10 जणांना अटक

Subscribe

पुण्यातील लोणी काळभोर येथील भारत पेट्रोलियमच्या डेपोतून मोठ्या प्रमाणात ऑइल तस्कर पेट्रोल डिझलची चोर करत असल्याचा प्रकार पोलिसांनी उघडकीस आणला आहे. ही चोरी कंपनीतील काही कर्मचारी करत असल्याचा संशय असून या प्रकरणी पोलिसांनी 10 जणांना अटक केली आहे. या प्रकरणाची घेत पुण्यातील पेट्रोल डिझेल असोशिएशनने याची तक्रार पेट्रोलियम मंत्र्यांकडे केली.

हवलेली तालुक्यातील लोणी काळभोरमध्ये भारत पेट्रोलियम, हिंदुस्तान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या तीन सरकारी कंपन्यांचे ऑइल डेपो आहेत. या ठिकाणी ऑइल साठवून येथून पुणे पिंपरी आणि जवळच्या जिल्ह्यांना पेट्रोल डिझेलचा पुरवठा केला जातो. पेट्रोल आणि डिझेलच्या ट्रकमधून ही वाहतून केली जाते. मात्र, या ट्रक मधून काही प्रमाणात पेट्रोल आणि डिझेल काढून त्याची तस्करी होत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या नुसार गुन्हे शाखेच्या पथकाने छापा टाकून काहींजणांना रंगे हात पकडले.

- Advertisement -

रोज 1 लाख रुपयांची चोरी? –

टँकर मधून बादल्यांच्या साह्याने पेट्रोल काढून त्याची चोरी केली जात होती. पोलिसांनी या प्रकरणी १० जणांना अटक केली आहे. रोज एका टँकर मधून १ लाख रुपयांच्या पेट्रोलची चोरी होत असल्याची माहिती आरोपींनी पोलिसांना दिली. हिंदुस्थान पेट्रोलियम आणि इंडियन ऑइल या इतर दोन कंपन्यांच्या शेजारीच असलेल्या डेपोमधून देखील चोरी होत असल्याचा संशय पोलिसांना आहे. यात या कंपण्याचे कर्मचारी तथा अधिकारी असल्याचा सांशीही व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दाखल घेण्याची मागणी पेट्रोल पंप चालकांच्या संघटनांनी केंद्र सरकारला केली आहे.

- Advertisement -
- Advertisement -
Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -