Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपुणेPune Ganeshotsav 2023: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Pune Ganeshotsav 2023: श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर हजारो महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Subscribe

पुण्यात गणपतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज 36 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. यावेळी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला.

पुणे:पुण्यात गणपतीचा मोठा उत्साह दिसून येत आहे. पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आज 36 हजार महिलांनी अथर्वशीर्ष पठण केलं. यावेळी महिलांमध्ये मोठा उत्साह दिसून आला. (There is great enthusiasm for Ganesha in Pune. Today 36 thousand women recited Atharvashirsha in front of the Shrimant Dagdusheth Halwai Ganpati in Pune)

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपतीसमोर ऋषीपंचमीनिमित्त पहाटे महिलांनी अथर्वशीर्ष पठण करून आदिशक्तीच्या सामर्थ्याची प्रचिती दिली. सह पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सुवर्णयुग तरूण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, यतिश रासने, अमर कोद्रे, सौरभ रायकर, मंगेश सूर्यवंशी, राजाभाऊ घोडके, ज्ञानेश्वर रासने, विलास रासकर, उपक्रम प्रमुख शुभांगी भालेराव, अर्चना भालेराव यावेळी उपस्थित होत्या. रशिया आणि थायलंड येथून आलेल्या परदेशी पाहुण्यांनी सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते.

- Advertisement -

36 वे वर्ष असल्यानं, पारंपरिक पेहरावात महिलांनी पहाटेपासूनच अथर्वशीर्ष पठणासाठी उत्सव मंडपासमोर गर्दी केली होती. उत्सव मंडपापासून ते हुतात्मा चौकारपर्यंतचा परिसरा महिलांच्या शिस्तबद्ध रांगेनं भरून गेला होता. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जप आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमल केलं. हात उंचावून टाळ्यांचा गरज करत महिलांनी गणरायाला अभिवादन केलं.

ऋषीपंचमीच्या पहाटे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीसमोर आदिशकक्तीच्या मंत्रोच्चाराने वातावरण मंगलमय झाले होते. यात रशिया व थायलंड येथूल आलेल्या परदेशी भक्तांनीदेखील सहभाग घेतला. अथर्वशीर्ष पठण उपक्रमाचे यंदा 36 वे वर्षे होते. महिलांनी शंखनाद केल्यानंतर ॐकार जर आणि मुख्य अथर्वशीर्ष पठण करत गणरायाला नमन केलं. मोबाईलचा टॉर्च उंचावूनदेखील महिलांनी गणरायाचा जयघोष केला. पहिले 20 महिलांचे पथक पहाटे 2 वाजता उपस्थित झालं होतं. तेव्हापासूनच महाराष्ट्रभरातून उपक्रमास आलेल्या महिलांची येथे येण्यास सुरूवात झाली.

- Advertisement -

(हेही वाचा: मुलीला वडिलांशी भेटू दिले नाही तर फ्लॅटच्या मालकी हक्क…; मुंबई उच्च न्यायालयाची महिलेला तंबी )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -