घरमहाराष्ट्रपुणेटीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण...; शरद पवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा टोला

टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण…; शरद पवारांच्या राजीनाम्यावर फडणवीसांचा टोला

Subscribe

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी ‘लोक माझे सांगाती’ पुस्तकाच्या दुसऱ्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यादरम्यान पक्षाच्या अध्यक्षपदावरून निवृत्त होण्याचा निर्णय जाहीर केला होता. या निर्णयावर गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी टोला लगावला आहे. ते म्हणाले की, टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागेल. पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित एका कार्यक्रमात फडणवीस बोलत होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, एक गोष्ट मला महाराष्ट्रामध्ये लक्षात आली नाही. टीआरपी कसा घ्यायचा याचं प्रशिक्षण आपल्याला घ्यावे लागले. मीच माझा राजीनामा माझ्या पक्षाकडे देतो, मग माझा पक्ष माझ्या राजीनाम्यावर आक्रोश तयार करेल. मग माझा पक्षच ठराव करेल. मग मीच माझा राजीनामा परत घेईन आणि मीच माझ्या जागी परत येईन आणि राजीनामा देताना शरद पवार यांनी राजीनाम्याचा कागद दिलाच नाही. असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंना टोला लगावला.

- Advertisement -

फडणवीस म्हणाले की, शरद पवारांना उद्धव ठाकरेंना सांगायचे होते की, राजीनामा देतो म्हणणं आणि राजीनामा देणं यातला फरक काय आहे. हा जो काही नवा फॉम्युला या ठिकाणी आला आहे. एक लक्षात ठेवा उसनं बळ घेऊन वाघ बनता येत नाही आणि वाघ दोन प्रकारचे असतात. वाघ बनताही येत कधीकधी. पण एक सर्कशीतला वाघ असतो आणि एक जंगलातला राजा असतो. जंगलातला राजा बनायचे असेल तर स्वत:ची ताकद लागते, स्वत:चं बळ लागतं. उसन्या बळावर कोणीही जंगलाचा राजा होऊ शकत नाही. हेही लक्षात घेतलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.

खासदार-आमदारांची संख्या किंवा राज्याच्या संख्येमध्ये सर्वात मोठं भाजपाचे सरकार
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, शरद पवार आता परवा म्हणाले की, कर्नाटकातील पराभवामुळे भाजपचा जोरच संपला. पाच-सहा राज्यात भाजपाचे सरकार आहे. परंतु त्यांना माहित नाही 16 राज्यात भाजपाचे सरकार आणि त्यानंतर उरलेल्या 8 राज्यात भाजपा प्रमुख विरोधी पक्ष आहे. देशामध्ये भाजपाचे एकूण 543 पैकी 302 खासदार आहेत. 100 राज्यसभेचे खासदार आहेत. देशामध्ये 1415 भाजपाचे आमदार आहेत, याचे अर्धे कोणाचेही नाही. देशामध्ये खासदार-आमदारांची संख्या किंवा राज्याच्या संख्येमध्ये सर्वात मोठं सरकार भाजपाचे आहे. सगळ्यात जास्त अनुकुलता भाजपाला आहे. त्यामुळे एखादं राज्य गेल्यानंतर शरद पवार यांना वाटत असेल की, भाजपा संपणार वर्गेरे, तर त्यांनी एवढीच आठवण देतो की, तुम्ही 2019 ला असाच विचार केला होता, जेव्हा 2018 ला राज्यस्थान, मध्यप्रेदश आणि छत्तीसगढ गेल्यावर तुम्हाला वाटलं सगळं संपलं. पण या तिन्ही राज्यात सहा महिन्यांमध्ये सर्व जागा भाजपाच्या निवडूण आल्या. कारण या देशामध्ये लोकाचं मोदींवर प्रेम आहे, असा टोला फडणवीसांनी लगावला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -