घर महाराष्ट्र पुणे पुणे-मुंबई प्रवास करताय...; ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही एक्स्प्रेस, लोकल गाड्या रद्द तर, काहींच्या...

पुणे-मुंबई प्रवास करताय…; ट्रॅफिक ब्लॉकमुळे काही एक्स्प्रेस, लोकल गाड्या रद्द तर, काहींच्या वेळात बदल

Subscribe

पुणे : पुणे विभागातील लोणावळा-पुणे रेल्वे मार्गावरील चिंचवड-खडकी स्टेशन दरम्यान मध्य रेल्वेकडून येत्या रविवारी (20 ऑगस्ट) ट्रॅफिक ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान, आटोमेटिक सिग्नलिंग बाबतीत महत्वपूर्ण कामे केली जाणार आहेत. त्यामुळे या काळातील काही एक्स्प्रेस आणि लोकल रद्द करण्यात आल्या असून काही गाड्यांच्या वेळात बदल करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली आहे. (Traveling Pune Mumbai Due to traffic block some express local trains are canceled some are rescheduled)

रविवार (20 ऑगस्ट) गाडी क्रमांक 12127/12128 पुणे-मुंबई-पुणे इंटरसिटी, 11007/11008 पुणे-मुंबई-पुणे डेक्कन, 12125/12126 पुणे-मुंबई-पुणे प्रगती, 11029/11030 मुंबई-कोल्हापुर-मुंबई कोयना एक्सप्रेस या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – NCP : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणजे पवार कुटुंब नाही; वाचा-कुणी म्हटले असे?

पुणे लोणावळा अप डाऊन मार्गावरील लोकल गाड्या रद्द

रविवार (20 ऑगस्ट) पुणे येथून तळेगावसाठी सकाळी 06.48 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01584, 08.53 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01586 तसेच पुणे येथून लोणावळ्यासाठी सकाळी 06.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01558, 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01562, 11.17 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01564, तसेच दुपारी 15.00 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01566, 16.25 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01568 रद्द करण्यात आली आहे. याशिवाय शिवाजीनगरहून तळेगावसाठी 15.47 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01588 , 17.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01570, तसेच शिवाजीनगरहून लोणावळ्यासाठी रात्री 08.10 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01560 रद्द करण्यात आली आहे.
याशिवाय लोणावळा वरून सकाळी 06.30 वाजता शिवाजीनगरसाठी सुटणारी लोकल क्रमांक 01553, 10.05 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01559, 15.30 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01563, तळेगाववरून 07.48 वाजता पुणे स्थानकासाठी सुटणारी लोकल क्रमांक 01585, 09.57 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01587, 16.40 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01589, लोणावळावरून सकाळी 07.25 वाजता पुणे स्थानकासाठी सुटणारी लोकल क्रमांक 01555, 08.20 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01557, दुपारी 14.50 वाजता सुटणारी लोकल क्रमांक 01561 रद्द करण्यात आली आहे.

- Advertisement -

हेही वाचा – सासू-सासऱ्यांचा छळ करणाऱ्या सुनेला 15 दिवसांत बंगला खाली करण्याचा न्यायालयाचा आदेश

एक्सप्रेस गाड्यांच्या वेळात बदल

गाडी क्रमांक 12939 पुणे –जयपुर एक्सप्रेस पुणे स्थानकावरून नियमित प्रस्थान वेळ 17.30 वाजता ऐवजी 17.45 वाजता सुटेल, तसेच गाडी क्रमांक 22943 दौंड –इंदौर एक्सप्रेस दौंडवरून नियमित प्रस्थान वेळ दुपारी 14.00 वाजता ऐवजी 18.00 वाजता सुटेल.

एक्सप्रेस गाड्या विलंबाने धावतील

20 ऑगस्टला सुटणारी गाडी क्रमांक 22159 मुंबई –चेन्नई, लोकमान्य तिलक टर्मिनस –काकीनाडा पोर्ट गाडी क्रमांक 17222, मुंबई –भुवनेश्वर गाडी क्रमांक 11019, मुंबई –हैदराबाद गाडी क्रमांक 22732 आणि 19 ऑगस्टला सुटणारी त्रिवेंद्रम – मुंबई गाडी क्रमांक 16332, बेंगलुरु –मुंबई गाडी क्रमांक 11302, ग्वालियर –दौंड एक्सप्रेस गाडी क्रमांक 22194 या एक्रप्रेस गाड्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे पुणे विभागावर विलंबाने चालतील, असे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -