घरमहाराष्ट्रपुणे...तर त्यांनी अजिंक्यतारा वरून उडी मारावी - उदयराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

…तर त्यांनी अजिंक्यतारा वरून उडी मारावी – उदयराजेंचे शिवेंद्रराजेंना आव्हान

Subscribe

सातारा – नगरपालिका निवडणुकीवरून साताऱ्यात खा .उदयनराजे भोसले यांनी त्यांचे बंधू आ.शिवेंद्रराजे यांच्यावर टीका केली आहे. माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणाऱ्यांनी हिम्मत असेल तर पुरावे द्यावेत. भ्रष्टाचार सिद्ध झाला तर अजिंक्यतारा किल्ल्यावरून कडेलोट पॉइंट वरून मी उडी मारेन. जर पुरावे देवू शकला नाहीत तर त्यांनी उडी मारावी, असे आव्हान उदयनराजेंनी शिवेंद्रराजेंना दिले आहे.

50 उमेदवार निवडून येतील – 

- Advertisement -

सातारा नगरपालिकेत आम्ही 50 उमेदवार काम करणारे दिले आहेत. हे उमेदवार लोकांसाठी झटणार आहेत. त्यामुळे आगामी नगरपालिका निवडणुकीत सातारा विकास आघाडीचे सर्व 50 उमेदवार निवडून येतील, असा दावा उदयनराजे भोसले यांनी केला.

निकाल आजच लागल्यात जमा –

- Advertisement -

शिवेंद्रराजेंच्या आघाडीचा एकही उमेदवार निवडून येणार नाही. निवडणुकीचा निकाल आजच लागल्यात जमा असून उगाच मिशा पिळून किंवा मिशांवर ताव मारून गोष्टी होत नसतात. त्याला फिरावे लागते. मी नगरसेवक पदापासून सुरूवात करुन खासदारा झाले आहे. त्यामुळे मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत. लोकांमध्ये कसे मिसळायचे, कसे काम करायचे, हे मला ठाऊक आहे. मात्र, यांना सोन्याच्या थाळीत आमदारकी सजवून मिळाली आहे, अशी खोचक टिप्पणी करत उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजेंवर टीका केली.

माजी जिल्हाधिकाऱ्यांना उदयनराजेंनी जोडले हात –

साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग यांची बदली होऊन 1 महिना झाला तरी सुद्धा त्यांनी अजून शासकीय बंगला खाली केलेला नाही. यामुळे नवीन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांना सातारा रेस्ट हाऊस मध्ये राहावे लागत आहे. त्यावरून उदयनराजे यांनी शेखर सिंग यांना फटकारले होते.

यावर पुन्हा उदयनराजेंनी  शेखर सिंग यांना हात जोडत आता तरी बास करा बंगला खाली करुन नवीन जिल्हाधिकारी यांना द्या, असे म्हटले आहे. साताऱ्यावर एवढे प्रेम असेल तर माझा राजवाडा आहे. तिथे येऊन राहू शकता शनिवार, रविवार आपण या ठिकाणी आलात तरी माझी हरकत नाही, असं म्हणत शेखर सिंग यांना टोला लगावला होता.

Ajinkya Desai
Ajinkya Desaihttps://www.mymahanagar.com/author/ajinkyadesai/
मागील 4 वर्षापासून डिजिटल मिडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -