सिंहगडावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या तरुणाचा दरडी खाली दबून मृत्यु

सिंहगड(sinhagad pune) किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ शनिवारी दरड कोसळल्याची भीतीदायक घटना घडली होती. पुण्यातील ३१ वर्षीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला.

पुणे : सिंहगड(sinhagad pune) किल्ल्याच्या कल्याण दरवाजाच्या बुरुजाजवळ शनिवारी दरड कोसळल्याची भीतीदायक घटना घडली होती. त्याच कोसळल्या दरडीखाली चिरडून पुण्यातील ३१ वर्षीय गिर्यारोहकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हेमंत धीरज गाला असं या मृत्यू झालेल्या गिर्यारोहकाचं नाव आहे. हेमंत गाला पुण्यातील मित्र मंडळ चौक या परिसरात राहणारा होता.
शनिवारी मध्यरात्री स्थानिक कार्यकर्त्यांनी घनदाट जंगलामध्ये दीडशे फूट खोल दरीत उतरून एका मजबूत दोऱ्याच्या साहाय्याने हेमंत गाला याचा मृतदेह बाहेर काढला.

३१ वर्षीय हेमंत गाला(hemant gala) याच्या दुर्दैवी मृत्यूने गाला कुटुंबासह त्याच्या मित्रपरिवारावर सुद्धा शोककळा पसरली आहे. हेमंत गाला हा त्याच्या कुटुंबातला एकुलता एक मुलगा होता. त्याच्या मागे त्याची आई – वडील आणि बहीण असा परिवार आहे. त्यामुळे एकुलत्या एका मुलाच्या मृत्यूने हेमंतच्या आई – वडिलांना मोठा धक्का बसला आहे. हेमंतच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

हेमंत गाला याला लहानपणापासूनच ट्रेकिंग आणि गर्यारोहणाची खूप आवड होती. हेमंत हा एक निष्णात आणि निपुण गिर्यारोहक म्ह्णून प्रसिद्ध होता. हेमंतने महाराष्ट्र राज्यातील अनेक गडकोट, सुळके, दुर्गम किल्ले अगदी उत्तमपणे सर केले आहेत. त्याचबरोबर हेमंतने हिमायलात(himalaya) सुद्धा यादी ट्रेकिंग केले होते. ट्रेकिंगच्या स्पर्धांमध्ये सुद्धा हेमंतने मोठं यश संपादन केलं होतं.

हे ही वाचा – नाशिक-पुणे रेल्वेमार्गात बदल; जिल्हा प्रशासनापुढे नवा पेचhttps://www.mymahanagar.com/maharashtra/changes-in-nashik-pune-railway-line-new-patch-before-district-administration/448602/

ट्रेकिंग स्पर्धेदरम्यान घडली दुर्घटना

सिंहगड एथिक्स ट्रेकिंग स्पर्धेमध्ये हेमंत गाला सहभागी झाला होता. याच्या सोबतच राज्याभरातून ३०० ट्रेकर्स सहभागी झाले होते. दरड कोसळली त्या घटनेनेनंतर हेमंत गाला बेपत्ता झालायचं लक्षात आलं आणि शोध घेतल्यांनंतर त्यांच्या मृत्यू झाल्याचं समोर आलं. त्याचबरोबर पावसाळा सुरू झाले की काही ठिकाणी दरड कोसळण्याचे प्रकार घडतात अशावेळी ट्रॅकिंगला जाताना योग्य ती काळजी घेणं सुद्धा अत्यंत गरजेचं असतं आणि शक्यतो दरड कोसळलेलया ठिकाणी ट्रेकिंगला किंवा फिरायला जाणं टाळलं पाहिजे.

हे ही वाचा –  मी सुशिक्षित गुंड आहे, रवीकिरण इंगवलेंना राजेश क्षीरसागरांचा इशाराhttps://www.mymahanagar.com/maharashtra/pune/rajesh-kshirsagars-warning-to-ravi-kiran-ingwale/450472/