Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र पुणे Weather Breaking : अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता; हवामान विभागाचं...

Weather Breaking : अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता; हवामान विभागाचं लक्ष 

Subscribe

पुणे : मान्सून ४ किंवा ५ जूनपर्यंत केरळ किनारपट्टीवर धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने (IMD) आधीच वर्तवला होता. त्यानुसार आज दक्षिणपूर्व अरबी समुद्रात नवीन चक्रीवादळ तयार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रतिकुल परिस्थीतीचा मान्सूनवर परिणाम होणार का? याकडे हवामान विभागाचे लक्ष असणार आहे. (Weather Breaking, Possibility of new cyclone formation in Arabian Sea, Attention of weather department in marathi)

चक्रीवादळाच्या स्थितीमुळे कर्नाटक आणि महाराष्ट्र किनार्‍याजवळ 8 ते 10 जून दरम्यान, तसेच गुजरातच्या किनार्‍याजवळील भागातील स्थिती 9 ते 12 जून या कालावधीत बिघडण्याची शक्यता असल्यामुळे हवामान विभाग चक्रीवादळावर बारीक लक्ष ठेवून आहे. याशिवाय मराठवाड्यात आज पुन्हा एकदा पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. पश्चिम महाराष्ट्रातही हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस राहील. परंतु विदर्भ आणि मुंबईत कमालीची उष्णता जाणवण्याची शक्यता जाणवेल असे हवामान विभागाने म्हटले आहे.

- Advertisement -

दरम्यान, जळगावमध्ये काल दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. वादळी वाऱ्यासह विजेचा कडकडाट झाल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण होते. भयंकर वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त असतानाच दुपारी अचानक पाऊस सुरु झाल्यामुळे नागरिकांची दाणादाण उडाली. सांगोला तालुक्यातील काळूबाळूवाडी येथे वीज पडून एक मेंढपाळ मृत्यू झाला, तर एक शेळीचा मृत्यू झाला. जळगावच्या चोपडा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातील चुंचाळे चौगाव मामलदे परिसरात वादळी वाऱ्यासह पाऊस, अनेक घरांचे छताचे पत्रे उडाले.

धुळे शहरातही पावसाने रविवारी सकाळी हजेरी लावली, तर काही ठिकाणी गारा पडल्याचे पाहायला मिळाले. धुळे जिल्ह्यातील शिरपूर, साक्री तालुक्यांतील काही भागांत गारांसह जोरदार पाऊस झाला. याचा फटका पिकांना बसला आहे. अनेकांनी कांदा काढून ठेवला आहे. कांदा खराब होण्याची शक्यता आहे. भुसावळ शहरात काल अचानक वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊसासह मोठ्या प्रमाणात वादळ आल्याने शहरातील मध्यवर्ती भागात वर्दळीच्या ठिकाणी एका इमारतीच्या सहव्या मजल्यावरील भिंत कोसळली.

पुण्यातील काही भागात रविवारी पावसाने हजेरी लावेली. अचानक पडलेल्या मान्सूनपूर्व पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. सुट्टीसाठी बाहेर पडलेल्या पुणेकरांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. शहरातील मुख्य रस्त्यांवर वाहतूककोंडी निर्माण झाली होती. याशिवाय खड्ड्यांमुळे किरकोळ अपघात झाल्याचे पाहायला मिळाले. पुण्यातील औंध, बाणेर रोड, विद्यापीठ परिसर, सांगवी या भागात जोरदार पाऊस सुरू झाला.
- Advertisement -

झाडे कोसळ्याचा वीजेला फटका
वेदविहार परिसराताली चार वितरण रोहित्रांचा वीजपुरवठा पावसामुळे वीजवाहिनीत बिघाड झाल्याने बंद पडली होती. भवानीपेठ येथे उपरी वाहिनीवर झाड पडल्याने चार वितरण रोहित्रांवरील ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित झाला होता. झाडे कोसळल्याने गोखलेनगरमधील जनता वसाहत, जनवाडी भागात तसेच पाषाण भागात वीजपुरवठा खंडित झाला होता, तर सुस रो़ड, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ परिसरात तातडीने दुरुस्ती कामे करुन वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला होता.

- Advertisment -