घरमहाराष्ट्रपुणेकोकणातले गेले पुण्यात व्हेल माशाची 'उलटी' विकायला; पोलिसांनी केली अटक

कोकणातले गेले पुण्यात व्हेल माशाची ‘उलटी’ विकायला; पोलिसांनी केली अटक

Subscribe

राजेंद्र राकेश कोरडे (वय २८, रा. मु.पो. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), नवाज अब्दुला कुरुपकर (वय २४), अजिम महमुद काजी (वय ५०, दोघे रा. मु.पो. अडखळ, जईकर मोहल्ला, अंजर्ले, ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६), अक्षय विजय ठणगे (वय २६ दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. 

पुणे : वेल माशाच्या उलटीची अवैधपणे विक्री केली जाते. आंतरराष्ट्रीय बाजारात त्याला मागणी आहे. त्याला कोट्यवधी रुपयांची किंमत मिळते. पालघर व आसपासच्या परिसरातून मोठ्या प्रमाणात याची तस्करी केली जाते. मात्र रत्नागिरी व दापोलीतून दोघेजण याची विक्री करण्यासाठी थेट पुण्याला गेले होते.

पोलिसांनी या दोघांना अटक केली आहे. त्यांच्यासोबत अजून तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. राजेंद्र राकेश कोरडे (वय २८, रा. मु.पो. अंजर्ले, ता. दापोली, जि. रत्नागिरी), नवाज अब्दुला कुरुपकर (वय २४), अजिम महमुद काजी (वय ५०, दोघे रा. मु.पो. अडखळ, जईकर मोहल्ला, अंजर्ले, ता. दापोली), विजय विठ्ठल ठाणगे (वय ५६), अक्षय विजय ठणगे (वय २६ दोघे रा. चैतन्यनगर, धनकवडी, पुणे) अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत.

- Advertisement -

आरोपींनी विक्री करण्यासाठी आणलेल्या वेल माशाच्या उलटीची आंतरराष्ट्रीय बाजारातील किमत तब्बल पाच कोटी रुपये आहे.आरोपींवर डेक्कन पोलीस ठाण्यात वन्यजीव संरक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फर्ग्युसन कॉलेज बस स्टॉपच्या मागील बाजूस पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्या हालचाली संशयास्पद होत्या. त्यांच्याकडील बॅगेची तपासणी केली असता, व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळून आला. चौकशी केल्यानंतर त्यांनी व्हेल माशाची उलटी विक्री करण्यासाठी आणल्याची कबुली दिली. त्यांना मदत करण्यासाठी दोन जण आल्याचेही त्यांनी पोलिसांना सांगितले. विजय ठाणगे व अक्षय ठाणगे या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

- Advertisement -

आरोपी राजेंद्र कोरडे याच्याकडे असलेल्या बॅगेमध्ये २ किलो ९९४ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा आढळला. याची किंमत २ कोटी ९९ लाख ४० हजार रुपये आहे, तर नवाज कुरुपकर याच्या बॅगेतून २ कोटी २८ लाख ६० हजार रुपये किमतीचा २ किलो २८६ ग्रॅम वजनाचा व्हेल माशाच्या उलटीचा तुकडा पोलिसांनी जप्त केला आहे.

परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त संदिपसिंह गिल यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मुरलीधर करपे व तपास पथकाच्या सहायक पोलीस निरीक्षक कल्याणी पाडोळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -