Maharashtra Assembly Election 2024
घरमहाराष्ट्रपश्चिम महाराष्ट्रBaba Adhav : बाबा आढाव कोण आहेत? त्यांचं आत्मक्लेश आंदोलन कशासाठी सुरू...

Baba Adhav : बाबा आढाव कोण आहेत? त्यांचं आत्मक्लेश आंदोलन कशासाठी सुरू आहे?

Subscribe

baba adhav Protest : महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात केली.

Who is Social Activist baba adhav : महायुती निवडून आल्यापासून विरोधकांनी एकच मुद्दा लावून धरला आहे, तो म्हणजे ‘ईव्हीएम’ आणि ‘ईव्हीएम’. सगळीकडे ‘ईव्हीएम’चीच चर्चा रंगली आहे. याच ‘ईव्हीएम’विरोधात ज्येष्ठ समाजसुधारक बाबा आढाव हे आंदोलनासाठी बसले आहेत. बाबा आढाव यांच्या आत्मक्लेश आंदोलनाचा आज ( शनिवार, 30 नोव्हेंबर ) तिसरा दिवस आहे.

गुरूवारी ( 28 नोव्हेंबर ) महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून पुण्यातील महात्मा फुले वाडा येथे बाबा आढाव यांनी आत्मक्लेश आंदोलनाला सुरूवात केली. ‘ईव्हीएम’ आणि पैशांच्या जोरावर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत हा निकाल आल्याचा आक्षेप बाबा आढाव यांनी घेतला आहे. त्यासह उद्योगपती गौतम अदानी यांच्याविरोधात संसदेत बोलू दिले जात नसल्याचंही बाबा आढाव यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा : “EVM हॅक करता येऊ शकते, आय एम अल्सो इंजिनियर, आय…”, महादेव जानकरांचा मोठा दावा

बाबा आढाव यांनी काय म्हटलं?

- Advertisement -

“विधानसभा निवडणुकीत लोकशाहीचं वस्त्रहरण करण्यात आलं आहे. लोकसभा निवडणुकीसाठी निर्णय वेगळा आणि लगेच झालेल्या विधानसभा निवडणुकीचा वेगळा कसा लागतो? ‘ईव्हीएम’ आणि पैशांच्या वापरामुळे हा निकाल आला आहे. या निवडणुकीत सतत मतदानाची टक्केवारी बदलत गेली आहे. यासाठी मी आत्मक्लेश आंदोलन करत आहे,” असं बाबा आढाव यांनी आंदोलनाला बसताना म्हटलं होतं.

“गौतम अदानी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. अदानींच्या विरोधात संसदेत बोलू दिलं जात नाही. याबाबत मी सरकारच्या विरोधात सत्याग्रह करणार आहे,” असंही बाबा आढाव यांनी घोषित केलं आहे.

बाबा आढाव कोण आहेत?

1970 मध्ये बाबा आढाव हे पुणे महापालिकेचे नगरसेवक होते. 95 वर्षीय असलेले बाबा आढाव तत्कालीन समाजवादी पक्षाचे होते. रिक्षा पंचायतीचे नेते म्हणून त्यांनी काम केले आहे. ‘एक गाव एक पाणवठा’ नावाच्या माहिमेचे प्रणेते बाबा आढाव आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते, माथाडी कामगार नेते, सामाजिक समतेची चळवळ उभी करणारे, सत्यशोधक म्हणून त्यांची ओळख आहे.

बाबा आढाव यांच्या आंदोलनाला कुणी-कुणी दिली भेट?

  1. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार
  2. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) प्रमुख, अजितदादा पवार
  3. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) नेते, माजी मंत्री छगन भुजबळ
  4. काँग्रेसचे नेते, माजी मंत्री विश्वजित कदम
  5. राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार )आमदार रोहित पवार

हेही वाचा : ‘CM’पद ‘Bjp’ कडे, दुसऱ्या क्रमांकासाठी शिंदे अन् अजितदादांमध्ये रस्सीखेच; भाजपचे बडे नेते म्हणाले, “तिघेही…”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -