घरमहाराष्ट्रपुणे'माझं पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस' म्हणणारा माणूस कुणाचा? सुषमा अंधारेंचा थेट सवाल

‘माझं पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस’ म्हणणारा माणूस कुणाचा? सुषमा अंधारेंचा थेट सवाल

Subscribe

गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे.

पुणे : राज्यात मागील काही दिवसांपासून आरक्षणाचा मुद्दा पेटलेला आहे. अशातच गुणरत्न सदावर्ते यांनी कोर्टात याचिका दाखल करून या प्रकरणाला आणखी पेटते ठेवले आहे. अशातच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माझा गुणरत्न सदावर्तेंशी काहीच संबंध नसल्याचे एका मुलाखतीत म्हटले होते. यावर आता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यावर बोट ठेवले असून, गुणरत्न सदावर्ते हा माणूस कुणाचा असा थेट सवाल केला आहे. (Who is the man who says my first love Devendra Fadnavis Direct question of Sushma Andahare)

गुणरत्न सदावर्ते यांच्याबद्दल ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी प्रश्न उपस्थित करत सरकारला धारेवर धरले आहे. गुणरत्न सदावर्ते हे भाजप आणि आरएसएसचा माणूस असल्याचे म्हणत सरकारमधील तीनही पक्षाचे नेते फक्त स्वार्थासाठी सत्तेत असल्याचेही त्या यावेळी म्हणाल्या. तर या तिघांचाही एकमेंकावर विश्वास नसल्याचाही दावा त्यांनी यावेळी केला.

- Advertisement -

हेही वाचा : बिहारप्रमाणे महाराष्ट्रात मराठा समाजासाठी आरक्षणाच्या टक्केवारीत वाढ होणार का?

जो माणूस आरएसएसच्या कार्यक्रमाला हजर…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या नातेसंबंधाविषयी बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या की, जो माणूस राष्ट्रीय स्वयम सेवक संघाच्या संचलनामध्ये ध्वजारोहणाच्या कार्यक्रमात उपस्थित राहतो, शरद पवार यांचा उल्लेख राष्ट्रवादी काँग्रेसचे वयोवृद्ध पुढारी असा करतो आणि देवेंद्र फडणवीस यांचा उल्लेख श्रद्धेय असा करतो. जो डंके की चोटपर सांगतो की, माझी पत्नी जयश्री पाटील असेल तरी माझं पहिलं प्रेम देवेंद्र फडणवीस आहे. आय लव्ह देवेंद्र फडणवीस असे म्हणतो. तो माणूस भाजपचा कसा असू शकत नाही असे म्हणत त्यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर सडकून टीका केली.

- Advertisement -

हेही वाचा : Demonetization 7 Years : 2016 ते यावर्षी 2000 रुपयांच्या नोटबंदीपर्यंतचा प्रवास

टॉम अँड जेरीच्या खेळात मला जास्त रमायचे नाही

मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी भाष्य केले. त्या म्हणाल्या की, मराठा समाजाला आरक्षण मिळालच पाहिजे. छगन भुजबळ यांनी काय बोलावं त्यांचा आधिकार आहे. हिंदू-मुस्लिम भांडण लावण्याचा डाव फसला. दुष्काळासारख्या इतर प्रश्नवरुन लक्ष हटवण्यासाठी, जाती- जातीमध्ये वाद लावले जात आहेत. तसेच जरांगे पाटलांच्या भेटीला न्यायाधीश पाठवण्याचा निर्णय फडणवीसांचा होता. आणि आता भुजबळ वेगळेच बोलतात. त्यांच्या या टॉम अँड जेरीच्या खेळात मला जास्त रमायचे नाही असाही टोमणा त्यांनी यावेळी मारला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -