घरमहाराष्ट्रफेटे घालून पुणेकरांनी काढली हेल्मेटसक्तीविरोधात रॅली

फेटे घालून पुणेकरांनी काढली हेल्मेटसक्तीविरोधात रॅली

Subscribe

पुणे पत्रकार संघ कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा थेट पोलीस आयुक्तकार्यालयावर धडकला. यावेळी पुणेकरांनी बंद करा,बंद करा हेल्मेटसक्ती बंद करा अशा घोषणा केल्या

पुण्यामध्ये हेल्मेटसक्तीविरोधात पोलिसांकडून सुरु असलेल्या धडक कारवाईविरोधात आज पुणेकरांनी मोर्चा काढला. हेल्मेटसक्ती कृती विरोधी समितीने याविरोधात मोर्चा काढला. या मोर्चामध्ये पुणेकर मोठ्यासंख्येने सहभागी झाले होते. सविनय कायदेभंग चळवळ असे या मोर्चाला नाव देण्यात आले आहे. या मोर्चामध्ये हेल्मेट न घातला वेगवेगळे प्रकारचे फेटे बांधून पुणेकर सहभागी झाले होते. पुणे पत्रकार संघ कार्यालय येथून निघालेला हा मोर्चा थेट पोलीस आयुक्तकार्यालयावर धडकला. यावेळी पुणेकरांनी बंद करा,बंद करा हेल्मेटसक्ती बंद करा अशा घोषणा केल्या. दरम्यान हेल्मेटसक्ती रद्द करावी या मागणीचे पत्र हेल्मेटसक्ती कृती विरोधी समिती पुण्याच्या आयुक्तांना देणार आहे.

३ लाखापेक्षा अधिक दंड वसूल

पुण्यामध्ये हेल्मेटसक्तीविरोधात १ जानेवारीपासून पुणे पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली. हेल्मेटसक्तीला पुणेकरांनी जोरदार विरोध केला. मात्र या विरोधाला झुगारत पुणे पोलिसांनी हेल्मेट न घालणाऱ्यांवर कारवाई सुरु केली. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी पुणे पोलिसांनी तब्बल ७ हजार ४९० जणांवर कारवाई केली आहे. हेल्मेटसक्तीच्या दंडात्मक कारवाईमध्ये पोलिसांनी तीन लाखापेक्षा अदिक दंड वसूल केला आहे.

- Advertisement -

हेल्मेट सक्तीतून मुक्तता करा

पुणे हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीने असे म्हटले आहे की, आमचा हेल्मेट वापरायला विरोध नसून आमचा हेल्मेट सक्तीला विरोध आहे. पुणेकर वाहतूकिच्या नियमांचे पालन करतात त्यामुळे त्यांची हेल्मेट सक्तीमधून मुक्तता करावी असी मागणी या समितीने केली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -