घरमहाराष्ट्रपुणेरी टोला; 'गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, पुण्याच्या पाण्याची लावली वाट'

पुणेरी टोला; ‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट, पुण्याच्या पाण्याची लावली वाट’

Subscribe

पुणेकरांनी पाणी प्रश्नावरुन भाजपला चांगलाच टोला दिला आहे. पुरेसा पाणीसाठा असूनही पुणेकरांना पाणीकपातीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे भाजप सरकारच्या विरोधात संतप्त झालेल्या पुणेकरांनी बॅनरबाजी केली आहे.

पाणी प्रश्नावरुन पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपला टोला दिला आहे. काही दिवसांपूर्वी पुणेकरांनी पुण्याचे पालकमंत्री गिरीष बापट यांच्या विरोधात पोस्टरबाजी केली होती. आता पुन्हा एकदा अगदी तसेच बॅनर लावून भाजपवर टीका केली गेली आहे. या पोस्टरमध्ये पुणेकरांनी लिहिले आहे की, ‘गल्ली ते दिल्ली तुमचा थाट…शंभर नगरसेवक आमदार आठ…पुण्याच्या पाण्याची लावली वाट’. या बॅनरच्या खाली ‘तुमच्या कारभारला कंटाळलेले पुणेकर’ असे लिहण्यात आलं आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पात पुरेसा पाणीसाठी असतानाही पुण्यात पाणीकपात सुरु आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पुण्याच्या पाणी पुरवठा विभागाची पूर्णपणे वाट लागली असूनही सत्ताधारी भाजपकडून कुठलीही ठोस भूमिका घेतली जात नाही. त्यामुळे संसप्त झालेल्या पुणेकरांकडून अशाप्रकारचे पोश्टरबाजी करुन भाजपचा निषेध व्यक्त केला जात आहे.

पुणेकरांना करावा लागतोय पाणीकपातीचा सामना 

गेल्या काही दिवसांपासून जसलंपदा विभाग आणि महानगरपालिका यांच्यात पाणी कपातीच्या मुद्दावरुन वादविवाद होत आहे. या दोघांच्या वादविवादात पुणेकर भरडले जात आहेत. त्यांना गरज नसतानाही पाणी कपातीला सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर पुणेकरांनी पोश्टरबाजी करण्यास सुरुवात केली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी पुणेकरांनी गिरीष बापट यांच्यावर टीका करणारे बॅनर लावले होते. आता त्यांनी पूर्ण भाजप सरकारवर टीका केली आहे. गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार असूनही या सरकारने पुण्याच्या पाण्याची वाट लावली आहे, अशी टीका पुणेकरांनी केली आहे.

- Advertisement -

महापौरांचे पुणेकरांना आवाहन

पुण्याच्या महापौर मुक्ता टिळक यांनी काही दिवसांपूर्वी जलसंपदा विभागाला पाणी पुरवठ्याच्या सूचना न देता पाणी कपात केल्यास पोलिसात तक्रार दाखल करु, असा इशारा दिला होता. जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी परस्पर निर्णय न घेता मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याशी चर्चा करुन निर्णय घ्यावा, असे टिळक यांनी सांगितले होते. त्याचबरोबर पुणेकरांनी घाबरुन जावू नये, असे आवाहन महापौरांनी केले होते.


हेही वाचा – पुण्यात लाखो लिटर पाणी वाया!

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -