पुण्यातील प्रसिद्ध उद्योगपती अविनाश भोसले यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

yes bank dhfl fraud case avinash bhosale diverted rs 300 crore while taking loan to buy property in london

पुण्यातील प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांना मुंबई सत्र न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डीएचएफएल बँक घोटाळा प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. दिवाण हाऊसिंग फायनान्स लिमिटेड (डीएचएफएल) आणि येस बँक घोटाळ्यात सहभागी असल्याबद्दल ईडीने भोसले यांनी अटक केली होती.

यावेळी ईडीने आपल्या रिमांड याचिकेत म्हटले की, भोसले हे एबीआयएल समूहाचे मालक आहेत. भोसले याचा सहआरोपी संजय छाब्रिया याच्याशी संगनमत होता. ज्यात 40 कंपन्यांसह 84 संस्थांचा समावेश आहे. भोसले यांच्या मालकीच्या युनिटमध्ये 431 कोटी रुपये बेकायदेशीरित्या मिळाले. त्यांच्या मालकीच्या एका प्रकल्पाच्या विकासासाठी DHFL कडून निधी प्राप्त झाला होता. मात्र अद्याप हा प्रकल्प पूर्ण झाला नसून कर्ज खाती एनपीएममध्ये बदली करण्यात आली.

30 एप्रिल रोजी सीबीआयने महाराष्ट्रातील अनेक बिल्डर्सच्या मालमत्तेवर छापेमारी केली होती. यावेळी यस बँकेचे संस्थापक राणा कपूर आणि DHFL बँकेचे कपिल वाधवान यांच्या भ्रष्टाचार प्रकरणात अविनाश भोसले यांना अटक करण्यात आली.

यापूर्वी देखील ईडीने फेमा कायद्यांतर्गत अविनाश भोसले यांची चौकशी केली होती. त्यांना नोटीस देखील बजावण्यात आली होती. परदेशात त्यांनी जी गुंतवणूक केली होती. त्यासंदर्भात चौकशी करण्यात आली होती. जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी  34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

अविनाश भोसले कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांचे सासरे आहेत. महाविकास आघाडी सरकारमधील अनेकांची अविनाश भोसले यांचे चांगले संबंध असल्याचे बोलले जाते. पुणे आणि मुंबई बांधकाम उद्योगात अविनाश भोसले यांचे मोठे नाव आहे.


आज ना उद्या ही सत्ता बरखास्त करणारच, नव्या सरकारबाबत शरद पवारांचा ठाम निर्धार