घर महाराष्ट्र रझाकारांप्रमाणे 'सजा' कारांना शिक्षा द्या; मराठवाडा मुक्तिसंग्रामनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट, म्हणाले...

रझाकारांप्रमाणे ‘सजा’ कारांना शिक्षा द्या; मराठवाडा मुक्तिसंग्रामनिमित्त राज ठाकरेंची पोस्ट, म्हणाले…

Subscribe

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच आपल्या खास शैलीतून त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र साधलं. मराठवाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर ही वेळ आणणाऱ्या सजा कारांना शिक्षा द्या, असं म्हणत त्यांनी शाब्दिक हल्ला केला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तसंच आपल्या खास शैलीतून त्यांनी विरोधकांवर टीकास्त्र साधलं. मराठवाडा मुक्त झाला पण, तरी या प्रदेशाची प्रगती झालेली नाही. त्यामुळे मराठवाड्यावर ही वेळ आणणाऱ्या सजा कारांना शिक्षा द्या, असं म्हणत त्यांनी शाब्दिक हल्ला केला. (Punish Saja cars like Razakars Raj Thackeray s post on the occasion of Marathwada Liberation War )

राज ठाकरे यांनी आश्वासनांची खैरात वाटणाऱ्या राजकारण्यांवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे, असं भाकितही केलं.

नेमकं राज ठाकरे काय म्हणाले?

- Advertisement -

आज 17 सप्टेंबर, मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा दिवस. मी मागे पण एकदा म्हणालो होतो तसं हा दिवस संपूर्ण मराठवाड्यात उत्सवासारखा साजरा व्हायला हवा, कारण मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीगीकरणाचा लढा नव्हता, ,तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

राज ठाकरे म्हणाले की, पुरेशा पाण्यासाठी मराठवाड्याचा झगडा गेली कित्येक दशकं सुरू आहे. यावेळेला मराठवाडा क्षेत्रांत पुरेसा पाऊस झाला नसल्यामुळे पुढच्या काही महिन्यांत पाण्यासाठीची वणवण बघायला मिळणार आहे, असंही ते म्हणाले.

ही प्रश्न विचारण्याची वेळ

- Advertisement -

राज ठाकरे म्हणाले की, एकानं आश्वासनं द्यायची आणि त्यावर दुसऱ्यांनी टीका करायची आणि टीका करणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना नक्की काय केलं याचा विचार करायचा नाही हे सुरू राहणार असेल तर मराठवाड्यातील जनतेनं आता दोघांनाही प्रश्न विचारण्याची वेळ आली आहे.

तुम्ही जो लढा दिलात तो काही तुमच्या तोंडाला कोणीतरी पानं पुसावीत म्हणून नव्हता याचं स्मरण राहू दे आणि तुम्हाला गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवण्याची हीच ती वेळ आहे, त्यासाठी निर्धार करण्याचा आजचा हा दिवस आहे, असंही ते म्हणाले. तसंच, तुम्ही जसा रझाकारांना धडा शिकवलात, आता तुमच्यावर ही वेळ ज्यांनी आणली त्या सजा कारांना शिक्षा द्या. पुन्हा एकदा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मुक्ती संग्राम दिनाच्या मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा, असं राज ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

(हेही वाचा: पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त राज्य सरकारची ‘नमो 11 कलमी’ कार्यक्रमाची भेट; सर्व घटकांच्या विकासाचा मानस )

- Advertisment -