घरताज्या घडामोडीपंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण?, नवज्योतसिंग सिद्धूंसह ४ नावांची चर्चा

पंजाबचे नवे मुख्यमंत्री कोण?, नवज्योतसिंग सिद्धूंसह ४ नावांची चर्चा

Subscribe

नवज्योतसिंग सिद्धूंच्या नावाला कॅप्टन यांचा विरोध

पंजाब मुख्यमंत्रीपदाचा कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंह यांच्या राजीनाम्यानंतर पुढील मुख्यमंत्री कोण अशी चर्चा सुरु झाली आहे. मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर पंजाबच्या राजकारणात खळबळ माजली आहे. अमरिंदर सिंह यांच्यानंतर आता पुढील मुख्यमंत्री म्हणून काँग्रेस नेते नवज्योतसिंग सिद्धू यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरु आहे. तर त्यांच्यासह आणखी चार नावे चर्चेत आहेत. शनिवारी संध्याकाळी झालेल्या सर्व आमदारांच्या बैठकीत मुख्यमंत्रीपदाची निवड करण्याचा निर्णय काँग्रेस हंगामी अध्यक्ष सोनिया गांधी घेणार असल्याचे ठरले आहे. यामुळे काँग्रेस हायकमांड आता पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्याची शक्यता आहे.

पंजाबच्या नव्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीमध्ये पाच नावांची चर्चा सुरु आहे. यामध्ये नवज्योतसिंग सिद्धू, सुनील जाखड, प्रतापसिंग बाजवा, राजकुमार वेरका आणि बेअंत सिंह यांचे नातू रवनीत सिंग बिट्टू यांच्या नावाची चर्चा सुरु आहे. काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या बैठकीमध्ये एकूण ८० पैकी ७८ आमदार उपस्थित होते. या बैठकीत दोन प्रस्ताव ठेवण्यात आले पहिल्या प्रस्तावात कार्यवाहू मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांच्या कामाचे कौतुक करण्यात आले तर दुसऱ्या सत्रात पंजाबच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत चर्चा करण्यात आली आहे. परंतु या बैठकीत मुख्यमंत्री कोण होणार यावर शिक्कामोर्तब झाला नाही. परंतु पुढील मुख्यमंत्री कोण होणार याचा निर्णय घेण्याचा अधिकार काँग्रेस हायकमांडला देण्यात आला आहे.

- Advertisement -

नवज्योतसिंग सिद्धूंच्या नावाला कॅप्टन यांचा विरोध

मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी एका खासगी वृत्तवाहिनीशी संवाद साधला आहे. यावेळी अमरिंदर सिंह यांनी म्हटलं आहे की, जर नवज्योत सिंग सिद्धूंना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली तर त्याला विरोध करण्यात येईल. कारण नवज्योत सिंग सिद्धूंचे पाकिस्तान प्रेम आपल्या सर्वांनाच भारी पडण्याची शक्यता आहे. याहून मोठी गोष्ट ही आहे की, जेव्हा नवज्योत सिंग सिद्धू मंत्री होते तेव्हा त्यांनी एकही फाईल उघडून बघितली नव्हती असे वक्तव्य अमरिंदर सिंह यांनी केलं आहे.

अमरिंदर सिंह यांचा राजीनामा

पंजाबचे मुख्यमंत्री अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिंह यांनी अखेर राजकीय पंजाबच्या राज्यपालांकडे आपला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सुपूर्द केला आहे. अमरिंदर सिंह राजीनामा देणार असल्याची चर्चा जोरदार रंगली होती. अमरिंदर सिंह यांनी राजनामा देणार नसल्याचे सांगितले होते. परंतु त्यांनी आता राजभवनावर जाऊन राज्यपालांकडे राजीनामा दिला आहे. अमरिंदर सिहं यांच्यासोबत त्यांचा मुलगाही उपस्थित होता. कॅप्टन आणि त्यांचे कट्टर विरोधी नवजोत सिंह सिद्धू यांच्यातील राजकीय युद्ध संपू शकले नाही. त्यामुळे आता अमरिंदर सिंह यांनी राजीनामा दिला आहे. ४८ नाराज आमदारांनी पक्षाच्या हायकमांडला पत्र लिहिल्यानंतर काँग्रेसने विधिमंडळ बैठक बोलावली या बैठकीपुर्वीच अमरिंदर सिंह यांनी अखेर आपला राजीनामा दिला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Punjab Congress crisis : हायकमांडने विश्वासू व्यक्तीलाच मुख्यमंत्री करावं, राजीनाम्यानंतर अमरिंदर सिंह यांचे वक्तव्य


 

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -