त्र्यंबक प्रकरणी हिंदू महासभा आक्रमक, मंदिराच्या प्रवेशद्वाराचे केले शुद्धीकरण

राज्यातील काही जिल्ह्यांत सध्या दंगली उसळत आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर मंदिरात देखील धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात इतर धर्मियांनी बळजबरीने मंदिराच्या आतमध्ये घुसण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे या घटनेवर हिंदू महासभा चांगलीच आक्रमक झाली आहे. यावरून बाह्मण महासंघाने पोलिसांना पत्र देऊन कारवाईची मागणी केली होती. त्यानंतर राज्य शासनाकडून या घटनेची दखल घेण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात हिंदू महासभेने उडी घेतली असून मंदिराच्या प्रवेशद्वारावर हिंदू महासभेकडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे.

त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महाद्वारावर हिंदू संघटनेच्या वतीनं गोमूत्र शिंपडून शुद्धीकरण करण्यात आलं आहे. याच महाद्वारातून इतर धर्मियांनी मंदिरात घुसण्याचा आरोप केला जातोय. त्यामुळे आज हिंदू महासभा आक्रमक झाला असून त्यांनी आज मंदिराच्या प्रवेशद्वाराचे शुद्धीकरण केले आहे. मंदिरात घुसण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना अटक करा, अशी मागणी त्यांच्याकडून करण्यात आली आहे. यावेळी त्र्यंबकेश्वर प्रकरणी 72 तासांत कारवाई करा, अशी मागणी हिंदू महासभेचे अध्यक्ष आनंद दवे यांनी केली आहे.

हेही वाचा : त्र्यंबकेश्वर प्रकरणावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया; प्रत्येक समाजातील लोकांनी…

मागील काही दिवसात हे प्रकरण चर्चेत आलं आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून याबाबत तपासणी सुरू असून मंदिर परिसरातील CCTV फुटेज तपासण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणी पाच जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

नेमकं प्रकरण काय?

13 मे 2023 रोजी रात्री 9:30 ते 10 या वेळेत श्री त्र्यंबकेश्वर मंदिराच्या उत्तर महादरवाजा येथे स्थानिक संदल निमित्त निघालेल्या मिरवणूकीतील काही इतर धर्मीय व्यक्तींनी उत्तर महादरवाजा येथून समस्त हिंदूधर्मीयांचं श्रद्धास्थान असलेल्या श्री त्र्यंबकेश्वर मंदिरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. ही गोष्ट अत्यंत गंभीर असून वरील कृत्यामुळे भारतातील समस्त हिंदूंच्या भावना दुखावल्यामुळे जिल्ह्यात, राज्यात आणि देशात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी. अन्यथा महासंघाकडून तीव्र आंदोलन करण्यात येईल, तसंच असे प्रकार भविष्यात होणार नाही यांची दक्षता घ्यावी, अशी विनंती या पत्रातून पोलीस प्रशासनाला करण्यात आली आहे.

हेही वाचा : दंगली घडवणारे खरे मास्टरमाइंड हे कलानगरमध्ये, नितेश राणेंचा हल्लाबोल