घरमहाराष्ट्रपेणमध्ये डॉक्टरला धक्काबुक्की

पेणमध्ये डॉक्टरला धक्काबुक्की

Subscribe

रुग्णालय बंद ठेऊन निषेध

येथील शासकीय उप जिल्हा रुग्णालयात कामावरील डॉक्टरला धक्काबुक्की करण्याचा प्रकार बुधवारी मध्यरात्री 12 वाजता घडला. त्यावेळी तेथे असलेल्या परिचारिकेलाही अश्लिल शिवीगाळ करण्यात आली. याचा रुग्णालय बंद ठेवून गुरुवारी निषेध करण्यात आला.

रात्री वाहन अपघातात जखमी झालेल्या एका रुग्णाला उपचारासाठी घेऊन चार ते पाच व्यक्ती आल्या. हे सर्व मद्यधुंद अवस्थेत होते. ड्युटीवरील डॉ. मनेषकुमार खोलवडीकर यांनी अपघाताची चौकशी करून नियमानुसार रुग्णाची नोंद करण्याचा सल्ला देताच संतप्त झालेल्या व्यक्तींनी त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. यावेळी परिचारिकेसह वॉर्ड बॉयलाही शिवीगाळ करण्यात आली. यावर डॉक्टरांनी त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिल्यानंतरही त्यांची अरेरावी सुरूच राहिल्याने पोलिसांना पाचारण करण्यात आले. पोलिसांनी दोघांना जागेवर ताब्यात घेतले, तर जखमी रुग्णासह इतर पळून गेले.

- Advertisement -

या घटनेच्या निषेधार्थ डॉक्टर व कर्मचार्‍यांनी सकाळपासून काम बंद ठेऊन आरोपींवर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत सेवा न देण्याचा पवित्रा घेतला. डॉक्टरांच्या संघटनेने विभागीय पोलीस अधीक्षक आणि तहसीलदारांना निवेदन दिल्यानंतर आरोपींवर कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर रुग्णालय पूर्ववत सुरू झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -