घरमहाराष्ट्रदेवेंद्र फडणवीसांसाठी सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू; 'त्या' व्हायरल व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया

देवेंद्र फडणवीसांसाठी सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू; ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर राऊतांची प्रतिक्रिया

Subscribe

मुंबई : एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अल्लू अर्जुनच्या श्रीवल्ली या हिट गाण्यातील काही ओळी बोलतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. याचपार्श्वभूमीवर बोलताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की, ते चांगलं गाणं गात असतील त्यांच्यासाठी आम्ही सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा ठेवू. संजय राऊत आज पत्रकार परिषदेत बोलत होते. (Put an all party orchestra for Devendra Fadnavis Sanjay Rauts reaction to sri valli song viral video)

हेही वाचा – OBC विरुद्ध Maratha मुद्द्यावरून कॅबिनेटमध्ये टोळी युद्ध; संजय राऊतांनी घेतली दोन मंत्र्यांची नावे

- Advertisement -

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावर तुमचं मत काय? या प्रश्नाचे उत्तर देताना संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही राजकारण्याकडे कौशल्य, कला असेल तर त्याने गायले पाहिजे. तो माणूस नाही का? त्याच्याकडे कला आहे. त्याची पत्नीही गाते. ते राजकारणविरोधी नक्कीच आहेत, पण देवेंद्र फडणवीस यांनी चांगलं गाणं गात असतील तर आम्ही सर्वपक्षीय ऑर्केस्ट्रा आयोजित करू आणि त्यांना त्याठिकाणी गाण्यासाठी बोलवू, असे संजय राऊत म्हणाले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Marathi Fire (@marathifire)

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस गायक जावेद अलीसोबत पुष्पा द राइजमधील ‘श्रीवल्ली’ गाणे गाताना दिसत आहेत. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका कार्यक्रमाला हजेरी लावली होती. हिंदीतील ‘श्रीवल्ली’ गाण्याला आपला आवाज देणारे गायक जावेद अली यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर माईक धरला आणि त्यांनी आपल्या सुंदर आवाजात ‘श्रीवल्ली’ गाण्याच्या काही ओळी गायल्या.

हेही वाचा – Maharashtra Politics : भाजपा हरते तिथे ईडी जाते; आरोप करताना राऊतांनी राष्ट्रवादीबद्दलही केलं भाष्य

दरम्यान, अल्लू अर्जुनचा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पुष्पा द राइज’चा ज्वर चाहत्यांमध्ये उतरत नाही आहे. आतापर्यंत लोकांमध्ये या चित्रपटाची क्रेझ आहे. ‘पुष्पा द राइज’ चित्रपटाचा दुसरा भाग लवकरच येणार आहे. अलीकडेच अल्लू अर्जुनने ‘पुष्प 2: द रुलचे’ पोस्टर रिलीज करून चाहत्यांची उत्कंठा आणखी वाढवली आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -