शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री अशक्य, नव्या सरकारबाबत ठाकरेंची ठाम भूमिका

शिवसेनेला बाजुला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यांनी आज शिवेसना भवनात माध्यमांशी संवाद साधला.

uddhav thackeray

शिवसेनेत फूट पाडून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला. या गटाला भाजपने पाठिंबा देत एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री केले आहे. मात्र, शिवसेनेला बाजुला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, अशी ठाम भूमिका राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. त्यांनी आज शिवेसना भवनात माध्यमांशी संवाद साधला. (Putting Shiv Sena aside, Sena Chief Minister Impossible – Uddhav Thackeray)

हेही वाचा – माझा राग मुंबईवर काढू नका, कांजूरमार्ग मेट्रो कारशेडचा प्रस्ताव बदलू नका, उद्धव ठाकरेंची विनंती

राज्यातील सत्तासंघर्ष अखेर काल मिटला. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तर, देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. दरम्यान, नव्या सरकारबाबत उद्धव ठाकरे काय प्रतिक्रिया देणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. त्यातच, त्यांनी आज सेनाभवनात येऊन माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिंदेसेनेला शिवसेनेचा दर्जा देण्यास अप्रत्यक्षपणे नकार दिला. भाजपने तथाकथित शिवसैनिकाला मुख्यमंत्री केला आहे. परंतु, शिवसेनेला बाजूला ठेवून सेनेचा मुख्यमंत्री होणार नाही, अशी ठाम भूमिका उद्धव ठाकरे यांनी घेतली.

हेही वाचा – विधिमंडळाचं अधिवेशन एक दिवसानं पुढे ढकलले, आता 3 आणि 4 जुलैला होणार अधिवेशन

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी मी हेच सांगितलं होतं, शिवसैनिकाला मुख्यमंत्री करा. अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्री पद वाटून घेऊ. मात्र, त्यावेळी तुम्ही नकार का दिला. आणि आताच का तथाकथित सेनेचा मुख्यमंत्री केला? तुम्ही दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडी स्थापनच झाली नसती. त्यामुळे हा शिवसेनेचा मुख्यमंत्री नव्हे. शिवसेनेशिवाय शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊ शकत नाही, असंही ठाकरे म्हणाले.

हेही वाचा – भाजपमध्ये ब्राह्मण नेत्यांचं खच्चीकरण, ब्राह्मण महासंघाचा आरोप

दिलेला शब्द भाजपने पाळला असता तर त्यांना अडीच वर्षे मुख्यमंत्री पद मिळालं असतं. पण, आता त्यांना पाचही वर्ष मुख्यमंत्री पद मिळणार नाही. सन्मानाने मुख्यमंत्री झाला असता. दिलेला शब्द पाळला असता तर महाविकास आघाडीचा जन्मच झाला नसता, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

आपलं मत कुठे फिरतंय?

ते पुढे म्हणाले की, लोकशाहीचे चार स्तंभ आहेत. या चार स्तंभानी पुढे येऊन लोकशाही वाचवली पाहिजे, अंसही उद्धव ठाकरे म्हणाले. लोकशाही कोसळली तर काहीच अर्थ उरणार नाही, असंही ते पुढे म्हणाले. आपल्याकडे गुप्त मतदान करण्याची पद्धत आहे. आपण कोणाला मत केलंय हे कोणालाही कळत नाही. पण आपण कोणाला मतदान केलंय हे तरी आपल्याला कळायला हवं. तरच, मतदाराचा लोकशाहीवरचा विश्वास उडेल.

आता मी सेना भवनात आहे. म्हणजेच इथे माहिम विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघातील मतदाराने केलेलं मत सूरत, गुवाहाटी, गोवा येथे फिरून आलं. पण मतदारांना कळलंच नाही. त्यामुळे आपलं मत कुठून कुठे फिरतंय हेच मतदाराला कळत नाहीय, मग लोकशाही राहिली कुठे? असा प्रश्न उपस्थित करून ठाकरेंनी सद्य परिस्थितीवर भाष्य केलं.

माझा राग मुंबईकर काढू नका

माझा राग मुंबईवर काढू नका. आरेचा निर्णय त्यांनी बदलला त्याचं मला खरचं दुख होत आहे. ही कोणाची खाजगी मालमत्ता नाही, तिथे कोण्या बिल्डरला आंदण देत नाही आहोत. तिथे पर्यावरणासाठी आवश्यक जंगल आणि वनराई होती ती एका रात्रीत….. रात्रीस खेळ चाले हे त्याच आता ब्रीद वाक्य आहे, एका रात्री झाडांची कत्तल झाली. असा टोला त्यांनी लगावला आहे.

कृपया करून माझा राग पर्यावरणावर काढू नका, मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजुरमार्गचा जो प्रस्ताव दिला आहे त्यात कुठेही अहंकार नाही. मी मुंबईकरांच्या वतीने हात जोडून विनंती करतो, आरेचा जो काही आपला आग्रह आहे तो रेटू नका. जेणेकरून पर्यावरणाला हानी पोहोचेल. अशी विनंतीही उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

आत्ता तर तिथे झाडं तोडून झाली आहेत. मधल्या काळात त्याही परिस्थितीत तिथे बिबट्या फिरतानाचा फोटो काही छायाचित्रकारांनी काढलेला आहे, तिथे वन्यजीवन आहे. असही उद्धव ठाकरे म्हणाले.