घरताज्या घडामोडीप्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ला घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या; मान्सूनपूर्व कामांना वेग

प्रवाशांच्या सुरक्षेसाठी सिंहगड किल्ला घाट रस्त्यावर संरक्षक जाळ्या; मान्सूनपूर्व कामांना वेग

Subscribe

राज्यात मुसळधार पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी रस्ता खचून (land slide) मोठी दुर्घटना घडते. या दुर्घटनांमुळे प्रवाशांना (passengers) मोठा फटका बसतो. यासाठी राज्याची सुरक्षा यंत्रणा (State security system) संज्ज झाली असून, या यंत्रणेने मान्सून (Monsoon) पूर्व कामाला सुरूवात केली आहे.

राज्यात मुसळधार पाऊस झाल्यास अनेक ठिकाणी रस्ता खचून (land slide) मोठी दुर्घटना घडते. या दुर्घटनांमुळे प्रवाशांना (passengers) मोठा फटका बसतो. यासाठी राज्याची सुरक्षा यंत्रणा (State security system) संज्ज झाली असून, या यंत्रणेने मान्सून (Monsoon) पूर्व कामाला सुरूवात केली आहे. राज्याच्या अनेक भागांत मान्सूनपूर्व कामांना सुरूवात झाली असून, पावसाचे पाणी साचू नये यासाठी विशेष खबरदारी घेतली जात आहे. अशातच आता, पुण्यातील सिंहगड किल्ला (Pune Sinha gad fort) घाट विभागात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रस्त्यालगतच्या डोंगरउतारांवर संरक्षक जाळी बसवण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे (PWD) हे काम करण्यात येणार आहे.

सिंहगड किल्ला घाट विभागात प्रवाशांच्या सुरक्षेसाठी रस्त्यालगतच्या डोंगरउतारांवर संरक्षक जाळी बसवसाठी पुणे वनविभागांतर्गत रस्त्याच्या सुरक्षेसाठी दीड कोटी रुपये देण्यात आले होते. त्यानुसार, पुणे वनविभागाला हे काम करण्यास परवानगी मिळाली असून, लवकरच या कामाला सुरूवात होणार आहे. आयआयटी मुंबईच्या तज्ज्ञांच्या पथकाने काही वर्षांपूर्वी किल्ल्याच्या पायथ्यापासून ते पार्किंग झोनपर्यंतच्या १० किमी रस्त्याचे तपशीलवार सर्वेक्षण केले होते. मार्गावरील १२ असुरक्षित ठिकाणे (Vulnerable spots) ओळखली होती. त्यांच्या सूचनांनुसार घाट विभागात चार ठिकाणी जाळ्या बसवण्यात आल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (पीडब्ल्यूडी) अधिकाऱ्याने सांगितले.

- Advertisement -

पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) बससेवा बंद केल्यामुळे आता पर्यटक त्यांच्या वाहनाने किल्ल्यावर जात आहेत. त्यामुळे कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यासाठी सर्व आवश्यक खबरदारीच्या उपाययोजनादेखील करण्यात येणार आहे. पावसाळ्यापूर्वी संरक्षक जाळ्या बसवल्या नाहीत तर घाटात मोकळी माती, दगडे वाहनांवर पडण्याची शक्यता जास्त असते. याआधीही अनेकवेळा ऐन रस्त्यावर मोठमोठे दगड कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत.


हेही वाचा – कश्मिरी पंडितांच्या मागे महाराष्ट्र ठामपणे उभा राहील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची नि:संदिग्ध ग्वाही

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -