घरCORONA UPDATECoronaVirus : कार्यालय असलेल्या इमारतीतच बनवले क्वारंटाईन कक्ष

CoronaVirus : कार्यालय असलेल्या इमारतीतच बनवले क्वारंटाईन कक्ष

Subscribe

महापालिकेच्या ए विभागातील डी.एन.रोडवरील नव्याने बांधलेल्या केम्को हाऊस या इमारतीत केमिकल फॅक्टरींचे मुख्य कार्यालय असतानाही चक्क १०० खाटांचे अलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आहे.

कोरोनाग्रस्तांच्या संपर्कातील हायरिस्क व्यक्तींना अलगीकरण कक्षात अर्थात क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात येत असून हे क्वारंटाईन कक्ष मनुष्य प्रवेश नसलेल्या इमारती अथवा वस्तींमध्ये करणे आवश्यक आहे. परंतु महापालिकेच्या ए विभागातील डी.एन.रोडवरील नव्याने बांधलेल्या केम्को हाऊस या इमारतीत केमिकल फॅक्टरींचे मुख्य कार्यालय असतानाही चक्क १०० खाटांचे अलगीकरण कक्ष निर्माण करण्यात आहे. त्यामुळे कार्यालय असलेल्या इमारतीत महापालिकेने उभारलेल्या या अलगीकरण कक्षामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. मात्र, आता कंपनीनेच आक्षेप घेतल्यामुळे महापालिका काय निर्णय घेते याकडे लक्ष आहे.

कोरोना आजारामुळे जागतिक स्तरावर महामारी घोषित केल्यानंतर मुंबईत याचा संसर्ग रोखण्यासाठी तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून विभागातील वापरात नसलेल्या रिकामी इमारती, हॉटेल्स, जिमखाना, गेस्ट हाऊस आदी ताब्यात घेण्याचे निर्देश महापालिका आयुक्त प्रविणसिंह परदेशी यांनी दिले. त्यानुसार महापालिकेच्या प्रत्येक विभागांच्या वतीने हॉटेल्स, लॉज, जिमखान्यांसह ओसी प्रमाणपत्र दिलेल्या बांधकाम पूर्ण झालेल्या इमारतीही ताब्यात घेण्याची प्रक्रीया पूर्ण झाली. कोरोनाविरोधातील लढयात प्रत्येकाने आपले योगदान देण्यासाठी कोरोनबाधितांसाठी जागा दिल्या. परंतु या जागा ताब्यात घेताना ज्या जागा वापरात आहेत, मनुष्य प्रवेश आहे. कार्यालये आहेत, अशा वास्तू ताब्यात घेवू नये, असेही निर्देश होते. परंतु महापालिकेच्या ए विभागातील डी.एन.रोडवर असलेल्या केम्को हाऊसच्या पहिल्या दोन मजल्यावर १०० खाटांचे क्वारंटाईन कक्ष तयार करण्यात आला. विशेष म्हणजे इमारतीच्या सहाव्या मजल्यावर केम्को ग्रुप ऑफ कंपनीचे मुख्य कार्यालय आहे. या कंपनीच्या अधिपत्याखाली चालणाऱ्या फॅक्टरींचे मॉनिटरींग याठिकाणाहून केले जाते.  या फॅक्टरी अत्यावश्यक सेवेतील आहेत. त्यामुळे सोमवारपासून लॉकडाऊनच्या अटी शिथिल करून अत्यावश्यक सेवेतील कार्यालयांना सूट दिल्यानंतर जेव्हा काही कर्मचारी कार्यालया परतले. तेव्हा त्यांना या इमारतीच्या पहिल्या दोन मजल्यावर कोरोनाग्रस्त रुग्णांसाठी क्वारंटाईन कक्ष बनवल्याची बाब निदर्शनास आली. त्यानुसार त्यांनी तात्काळ महापालिकेच्या ए विभाग कार्यालयात याची माहितीही दिली.

- Advertisement -

केम्को ग्रुप ऑफ कंपनीच्या सर्व फॅक्टरी या अत्यावश्यक सेवेतील असल्याने त्या फॅक्टरी सुरु आहेत. आणि त्याचे मुख्य कार्यालय या इमारतीत आहे. त्यामुळे अशाप्रकारे क्वारंटाईन कक्ष तयार केल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कार्यालयात कसे यायचे असा सवाल कंपनीने केला आहे.

महापालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाचे प्रमुख अभियंता विनोद चिठोरे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ज्या इमारतींना ना हरकत प्रमाणपत्र दिले आहे,त्यांची यादी विभाग कार्यालयांना दिल्या आहेत. परंतु त्या इमारतीचा ताबा विकासकाने दिला आहे की त्यांच्याकडेच आहे, याची पाहणी विभाग कार्यालयाने करून निर्णय घ्यायचा आहे,असे म्हटले आहे.

- Advertisement -

महापालिकेच्या ए विभागाच्या सहायक आयुक्त चंदा जाधव यांनी याबाबत स्पष्ट केले की इमारत प्रस्ताव विभागाकडून आम्हाला ही यादी पाठवली होती. त्यानुसार या इमारतीच्या विकासकाने दोन मजले देण्याची तयारी दर्शवली. त्यानुसार ते ताब्यात घेवून त्याठिकाणी १०० खाटांचे क्वारंटाईन कक्ष तयार केले आहे. सध्या यामध्ये जसलोक रुग्णालयातील नर्सेससह या विभागातील  कोरोनाबाधितांच्या संपर्कातील २६ व्यक्तींना ठेवण्यात आल्याचे म्हटले आहे. जर इथे कार्यालय आहे तर यापूर्वी त्यांनी आक्षेप का नोंदवला नाही, असाही सवाल त्यांनी केला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -