लोटस ऑपरेशन शिवसेनेनेच केले का?, राजकीय वर्तुळात चर्चा

Eknath-Shinde

महाविकास आघाडीमधून शिवसेना बाहेर पडण्याची तयार असल्याचे वक्तव्य संजय राऊत यांनी केले आहे. मात्र, त्यासाठी पहिले मुंबई या आणि अधकृत मागणी करा. तुमच्या मागणीचा नक्की विचार करू, असी अट संजय राऊत यांनी ठेवली आहे. संजय राऊत यांच्या या वक्तव्यानंतर काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हान यांनी आश्चर्य व्यक्त केले होते. दरम्यान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल संवाद साधला यात ते महावकिसा आघाडीमधून बाहेर पडण्याबाबत काहीही बोलले नाहीत. मग 20 तासामध्ये अचानक काय झाले?, असा प्रश्न पृथ्वीराज चव्हान यांना पडला आहे.

संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांना ही ऑफर दिली आहे. शिंदे यांच्या या ऑफरनंतर सोशल मीडियावर फिरत असलेल्या कॉन्सफिरसी थिअरी खऱ्या आहेत का? असा प्रश्न पन्हा एकदा उपस्थित झाला आहे. शिवसेनेच्या एक्झिट प्लॉटनची कान्सपिरसी थेअरी- एकनाथ शिंदे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार कसे फोडू शकतात?, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

एकनाथ शिंदे आणि शिवसेनेचे 80 टक्क्यांपेक्षा जास्त आमदार मातोश्रीला थेट आव्हान कसे देऊ शकतात? शिवसेनेची मुख्यमंत्रीपदाची अडीच वर्ष संपली आहेत, जो फॉर्म्युला 2019 ला भाजपला दिले आहे. एकीकडे चौकशीचा ससेमिरा, तसेच लोकसभा आणि विधानसभेत शिवसेनेचा थेट राष्ट्रवादीशी होणारा सामना टाळता येऊ शकतो