Thursday, June 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर ताज्या घडामोडी एस व्ही आर श्रीनिवास MMRDA आयुक्त, म्हैसकर गृहनिर्माण प्रधान सचिवपदी

एस व्ही आर श्रीनिवास MMRDA आयुक्त, म्हैसकर गृहनिर्माण प्रधान सचिवपदी

गृहनिर्माण प्रधान सचिव पदाची मिलिंद म्हैसकर यांच्याकडे जबाबदारी

Related Story

- Advertisement -

आर ए राजीव यांचा मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदाचा महानगर आयुक्त म्हणून कालावधी संपुष्टात आल्याने हे पद रिक्त झाले होते. या पदाचा तात्पुरता कार्यभार हा सोनिया सेठी यांच्याकडे देण्यात आला होता. पण शासनाने एमएमआरडीए महानगर आयुक्त पदावर आता एस व्ही आर श्रीनिवास या सनदी अधिकाऱ्याची बदली केली आहे. त्यांच्याकडे सध्या प्रधान सचिव गृहनिर्माण विभाग ही जबाबदारी होती. त्यांची बदली आता एमएमआरडीए महानगर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. तसेच प्रधान सचिव गृहनिर्माण पदाचा कार्यभार हा मिलिंद म्हैस्कर यांच्याकडे देण्यात आला आहे.

एमएमआरडीए आयुक्त असलेले आर ए राजीव यांना मुदतवाढ मिळाल्यामुळे त्यांच्या सेवा कालावधीत वाढ झाली होती. त्यांच्या मुदतवाढीच्या शेवटच्या दिवशीच मेट्रो ७ आणि मेट्रो २ अ साठीच्या चाचणीचा कार्यक्रम आटपून घेतला. त्याच दिवशी आर ए राजीव यांचा सेवानिवृत्तीच्या निमित्ताने सत्कारही करण्यात आला. पण या रिक्त झालेल्या जागी आता एस व्ही आर श्रीनिवास यांची वर्णी लागली आहे. एस व्ही आर श्रीनिवास यांनी धारावी पुर्नविकास प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून याआधी काम पाहिले आहे. त्याशिवाय माहिती आणि तंत्रज्ञान विभागाचीही मोठ्या कालावधीसाठी त्यांनी जबाबदारी हाताळली आहे. ठाकरे सरकारमध्ये त्यांच्याकडे गृहनिर्माण विभागाची प्रधान सचिव म्हणून जबाबदारी देण्यात आली होती. पण एमएमआरडीए आयुक्त ही महत्वाची जागा रिक्त झाल्यानंतर त्यांना एमएमआरडीए महानगर आयुक्त म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. तर मिलिंद म्हैस्कर प्रधान सचिव (वने) यांची नियुक्ती प्रधान सचिव,(गृहनिर्माण) या पदावर करण्यात आली आहे.

- Advertisement -

एमएमआरडीएचे मुंबई महानगर क्षेत्रात येत्या दिवसात मेट्रोचे जाळे विस्तारीत होणार असल्यानेच याठिकाणी एक अभ्यासू आणि अनुभवी सनदी अधिकाऱ्याची गरज होती. एस व्ही आर श्रीनिवास यांच्याकडे माहिती तंत्रज्ञान विभागाचा तसेच धारावी पुर्नवसन विभागाच्या सीईओ पदाचा अनुभव असल्याने त्यांच्यासाठी ही नवीन जबाबदारी जास्त कठीण ठरणार नाही. तर दुसरीकडे मिलिंद म्हैस्कर यांनी म्हाडामध्ये अनेक वर्षे योगदान दिल्याने त्यांच्या दृष्टीनेही गृहनिर्माण विभागाचा प्रधान सचिव पदाचा कार्यभार ही एक योग्य व्यक्तीकडे जबाबदारी मिळाली असल्याची चर्चा आहे. येत्या दिवसांमध्ये मुंबई महानगर प्रदेशात तसेच उर्वरीत राज्यात गृहनिर्माण विभागाचे धोरण निश्चित करण्यासाठी त्यांचा अनुभव नक्कीच या विभागाला कामी पडणार आहे.


 

- Advertisement -