घरमहाराष्ट्रमध्यरात्री थेट ऑक्सिजन सिलेंडरसह धडकला हॉस्पिटलमध्ये, आर.आर.पाटलांच्या रोहितचं होतंय कौतुक

मध्यरात्री थेट ऑक्सिजन सिलेंडरसह धडकला हॉस्पिटलमध्ये, आर.आर.पाटलांच्या रोहितचं होतंय कौतुक

Subscribe

देशभरासह राज्यात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. कोरोना बाधितांची दिवसेंदिवस वाढणारी संख्या बघता आरोग्य यंत्रणेवर देखील ताण येत आहे. कोरोना रुग्ण वाढल्याने सर्वच रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. दरम्यान, सांगली जिल्ह्यात देखील काही प्रमाणातच ऑक्सिजन शिल्लक असताना मध्यरात्री थेट ऑक्सिजन सिलेंडरसह आर.आर.पाटलांचा मुलगा रोहित हॉस्पिटलमध्ये धडकला आणि कोरोना रूग्णांच्या मदतीसाठी हजर झाला. रात्री साडेबारा वाजता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आर आर पाटील यांचा मुलगा रोहित पाटील यांना फोन केला. “रोहित, ऑक्सिजन टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे”. अजित पवारांच्या फोननंतर काही क्षणातच रोहित पाटील यांनी मध्यरात्री सांगलीत जाऊन ऑक्सिजन टँकर उतरुन घेतला. त्यांनतर यातील २३ जम्बो टाक्या आणि २ डुरा टाक्या ऑक्सिजन घेऊन रोहित पाटील स्वतः ग्रामीण रुग्णालयात रात्री उशिरा उपस्थित झाले. ऑक्सिजनअभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.

सततच्या पाठपुराव्याला आले यश

राज्यभरात रुग्णसंख्या वाढ वेगाने होत असल्याने ऑक्सिजनचा मोठा तुटवडा भासत आहे. तासगावातही कोरोना रुग्णांसाठी ऑक्सिजन कमी पडत असताना तासगावच्या आमदार सुमन पाटील, आर आर पाटील यांचे पुत्र रोहित पाटील यांच्या प्रयत्नातून इथल्या ग्रामीण रुग्णालयात कोरोनाग्रस्तांसाठी ५६ ऑक्सिजनेटेड बेड उपलब्ध झाले. ऑक्सिजनचा तुटवडा भासत असताना तासगावातील रुग्णांसाठी ऑक्सिजन टँकर उपलब्ध करुन द्यावा, अशी मागणी रोहित पाटील यांनी राज्य सरकारकडे केली होती. या मागणीचा ते सातत्याने पाठपुरावा करत होते. रोहित पाटील हे कोरोनाची गंभीर स्थिती सरकारच्या निदर्शनास आणून देत होते. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे देखील त्यांनी ऑक्सिजन टँकरची मागणी लावून धरली होती आणि अखेर त्यांच्या पाठपुराव्याला यश आले.

- Advertisement -

मध्यरात्री अजित पवारांचा रोहित पाटलांना फोन

“रोहित, ऑक्सिजनचा टँकर पाठवला आहे. तू स्वतः थांबून तो उतरुन घे”, असा अजित पवारांनी रोहित पाटील यांना फोन केला. अजित पवारांच्या या सुचनेनंतर रोहित पाटील स्वतः मध्यरात्री घरातून बाहेर पडले. भारत गॅसच्या विवरण केंद्रावर रात्री उशिरापर्यंत थांबून त्यांनी ऑक्सिजनचा टँकर उतरुन घेतला. त्यामुळे ऑक्सिजनभावी कोरोना रुग्ण दगावू नयेत, याची काळजी घेत मध्यरात्री रुग्ण वाचवण्यासाठी आबांच्या मुलाने केलेल्या धडपडीचे सध्या कौतुक होत आहे.

 

Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -