सत्यजित तांबेंना भाजपचा पाठिंबा, विखे पाटलांकडून निर्णय जाहीर

satyajeet tambe

मागील काही दिवसांपासून नाशिक पदवीधर निवडणूक चर्चेचा विषय ठरत आहे. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबेंनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक अर्ज भरला आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांना काँग्रेस पक्षाने निलंबीत केलं. शुभांगी पाटील यांना महाविकास आघाडीने पाठिंबा दिल्यानंतर आता भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सत्यजित तांबे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.

सत्यजित तांबेंना पाठिंबा देण्याबाबत भाजपचे ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, निर्णय जाहीर करण्याचा प्रश्नच नाही. कारण कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. परंतु पक्षाच्या वतीने पाठिंबा अजून जाहीर झालेला नाही. भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी तांबे यांचे स्टेटस ठेवले आहे. मात्र, कार्यकर्ता स्तरावर हा निर्णय घेण्यात आला आहे, असं विखे पाटील म्हणाले.

यापूर्वी सुजय विखे पाटील यांनी भूमी पुत्रांना न्याय दिले पाहिजे. यासंदर्भात प्रश्न विचारला असता विखे पाटील म्हणाले की, त्यांचे हे विधान सकारात्मक घेतले पाहिजे.

सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला असून भाजपाने अद्यापही खुला पाठिंबा दिलेला नाही. मात्र, पाठिंबा जाहीर होण्याआधीच भाजपाचे नेते तथा माजी मंत्री आणि आमदार अमरीशभाई पटेल यांनी शिरपूरमध्ये प्रचार मेळावा घेऊन सत्यजित तांबेंना मतदान करण्याचे आवाहन पदवीधरांना केलं आहे. माजी आमदार सुधीर तांबे यांच्याशी असलेल्या ऋणानुबंधामुळे आणि सत्यजित तांबे यांनी नेहमीच केलेल्या सहकार्यामुळे त्यांचा प्रचार करत असल्याची माहिती आमदार अमरिश पटेल यांनी दिली होती.


हेही वाचा : सत्यजित तांबेंच्या प्रचारासाठी भाजपाचे आमदार मैदानात, पदवीधारांशी साधला संवाद