घर महाराष्ट्र राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा - प्रकाश आंबेडकर

राधाकृष्ण विखे-पाटील भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा – प्रकाश आंबेडकर

Subscribe

आगामी काळात भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरे असू शकतात, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी करीत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.

आगामी काळात भाजपकडून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे मुख्यमंत्रीपदाचा चेहरे असू शकतात, असे विधान वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी करीत राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली.

त्यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की, आगामी काळात काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा होण्यासाठी काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरातही प्रयत्नशील आहेत. ती खेळी माझ्या अंदाजाने बाळासाहेब थोरात विरोधात राधाकृष्ण विखे-पाटील अशी आहे असे मी त्या ठिकाणी मानतो. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे आवडणार नाही, परंतु भाजपचा नवीन मुख्यमंत्रीपदाचा चेहरा हा राधाकृष्ण विखे-पाटील होऊ शकतात. त्याचबरोबर जी काही नगरमधील खेळी झाली आहे, त्यातून बाळासाहेब थोरातांनाही इच्छा झालेली दिसते की आपण काँग्रेसचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा व्हावे, असेही प्रकाश आंबेडकर म्हणाले.

- Advertisement -

यावेळी त्यांनी ठाकरे गटासोबत होऊ घातलेल्या युतीवरही भाष्य केले. बाळासाहेब ठाकरेंचे वडील प्रबोधनकार ठाकरे होते. प्रबोधनकार आणि बाबासाहेबांचा लढा एकत्र होता. उद्धव ठाकरेंनी माझ्या आजोबांचे हिंदुत्व मी घेतो हे जाहीर केल्यामुळे धर्म सुधारण्याची चळवळ सुरू झाली, असेही प्रकाश आंबेडकरांनी सांगितले.

मंत्री चंद्रकांत पाटलांना टोला
उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांचा मी सत्कार करायला तयार आहे. शिवाजी पार्कला ५ लाख लोक जमवून मी आपला सत्कार करणार आहे. कोणी कोणी भिकेचे पैसे घेऊन आपल्या संस्था उभ्या केल्या. उरलेल्या संस्था या खोक्याच्या संस्कृतीतून उभ्या केल्या हे तुम्ही का विसरता. मंत्रीपद टिकवण्यासाठी सत्य त्यांनी अप्रत्यक्षपणे मांडले. ते सगळ्यात महत्त्वाचे आहे असे मी मानतो, असा टोलाही त्यांनी चंद्रकांत पाटलांना लगावला.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -