‘अनिल परबांना एसटीचं काम केबल कनेक्शन देण्याइतकं सोपं वाटतं का?’; विखे-पाटलांची खोचक टीका

vikhe patil

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी परिवहन मंत्री अ‍ॅड. अनिल परब यांच्यावर खोचक टीका केली आहे. अनिल परब यांनना एसटीचं काम हे केबल देण्याइतकं सोपं वाटतं का? अशी खोचक टीका विखे पाटलांनी केली. विखे पाटील यांनी शिर्डी येथे पत्रकार परिषद घेत ही टीका केली.

विखे पाटलांनी पत्रकार परिषदेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरुन अनिल परब यांच्यावर जोरदार टीकास्त्र डागलं. अनिल परब यांना मुंबईत केबल कनेक्शन दिल्यासारखं एसटीचं काम सोपं वाटत का? परब यांनी कधी एसटीमधून प्रवास केलाय का? कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या, कुटुंबाचा आक्रोश पाहिल्यावर मंत्र्यांच्या आरत्या ओवाळयाच्या का?, असे संतप्त सवाल विखे पाटलांनी केले. तसंच, सदाभाऊ खोत यांनी केलेल्या वक्तव्याचं मी समर्थन करतो असं विखे-पाटील म्हणाले.

शरद पवारांवर टीका

राधाकृष्ण विखे पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली. राज्यातल्या ज्येष्ठ नेत्यांना माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची पाठराखण करायला वेळ आहे. मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी त्यांना वेळ मिळत नाही ही राज्याची शोकांतिका आहे, असा टोला विखे पाटलांनी शरद पवारांचं नाव न घेता लगावला.