घरमहाराष्ट्रराधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार?

राधाकृष्ण विखे पाटील काँग्रेसमध्येच राहणार?

Subscribe

राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. मात्र ते काँग्रेसमध्येच राहणार, असा खुलासा त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी केला आहे.

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात होत आहेत. मात्र ते काँग्रेसचे आहेत आणि काँग्रेसमध्येच राहणार असा खुलासा स्वतः त्यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी केला आहे. सुजय यांनी गेल्या महिन्यातच भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांना लोकसभेसाठी अहमदनगरमधून भाजपकडून उमेदवारीदेखील देण्यात आली आहे. आज, शुक्रवारी सुजय यांच्या समर्थनार्थ अहमदनगर येथे सकाळी ११ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी पंतप्रधान मोदी नगरमध्ये येणार असून सभेत भाषण करणार आहेत. दरम्यान, सभेच्या तयारीवर देखरेख करण्यासाठी आलेल्या सुजय यांनी विरोधी पक्षनेते काँग्रेसमध्ये राहणार असल्याची माहिती एका वाहिनीला प्रतिक्रिया देताना सांगितली. त्यामुळे राधाकृष्ण विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशबाबत पुन्हा सस्पेन्स कायम राहिला आहे.

थोरात – विखे वाद रंगला

सुजय विखे पाटील यांच्या भाजप प्रवेशावर बाळासाहेब थोरात यांनी आता काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले होते. राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसबाबत आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी थोरातांनी केली होती. विखे पाटील यांच्या कुटुंबाला काँग्रेसने खूप काही दिले आहे. त्यांच्या सगळ्या अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या आहेत. सुजय विखे यांचा निर्णय अजिबात वैयक्तिक नाही. काँग्रेसने एखाद्या कुटुंबाला किती दिले, हा विचार केला तर सर्वात जास्त विखे कुटुंबाला दिले आहे, असे थोरात म्हणाले. विखेंच्या सर्वच अपेक्षा पक्षाने पूर्ण केल्या असताना हा निर्णय त्यांना फायदेशीर ठरणार नाही याचा मला विश्वास आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

यासाठी पक्ष स्थलांतर नाही 

  • राधाकृष्ण विखे पाटील हे विधानसभेच्या विरोधी पक्षनेते पदी आहेत. जर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर त्यांना काँग्रेसने दिलेले महत्त्वाचे पद सोडावे लागेल. मात्र एवढं महत्त्वाचं पद सोडण्यास विखे पाटील तयार नाहीत.
  • गेल्या कित्येक वर्षांपासून राजकारणात सक्रिय असणारे राधाकृष्ण विखे पाटील यांनी ग्रामपातळीवरून थेट विधानभवनापर्यंत मजल मारली आहे. एवढ्या उंचीवर आल्यानंतर जर ते भाजपात गेले आणि तरीही सुजय यांचा पराभव झाला तर त्यांची नाचक्की होईल, या भीतीनेही ते काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार नाही. 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -