घरमहाराष्ट्रशरद पवारांच्या जातीबाबतच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांची उपरोधिक टीका, म्हणाले...

शरद पवारांच्या जातीबाबतच्या वक्तव्यावर राधाकृष्ण विखे पाटलांची उपरोधिक टीका, म्हणाले…

Subscribe

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नेमकी जात कोणती? यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. पण या वादात आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उडी घेतली आहे.

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची नेमकी जात कोणती? यावरून नव्या वादाला सुरुवात झाली आहे. प्राध्यापक नामदेव जाधव यांनी शरद पवार यांच्या जातीचा उल्लेख असलेले काही कागदपत्रे सोशल मीडियावर व्हायरल केले होते. त्यावरून राजकीय वर्तुळात विविध चर्चा रंगल्या. मात्र, आपली जात मराठा असल्याचा दावा शरद पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. सगळ्या देशाला माझ्या जातीबाबत माहित असल्याचे प्रसार माध्यमांसमोर सांगितले आहे. (Radhakrishna Vikhe Patil’s ironic criticism of Sharad Pawar’s statement on caste)

हेही वाचा – अद्वय हिरेंच्या अटकेवर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया म्हणाले; “आमचे सरकार आल्यावर…”

- Advertisement -

शरद पवारांच्या जातीवरून सुरू असलेल्या या वादात आता महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी उडी घेतली आहे. पवारांच्या जातीबाबत बोलताना विखे पाटील यांनी उपरोधिक टीका केली आहे. शरद पवार म्हणाले की, मी कधीच जातीचे राजकारण केले नाही. माझी जात लोकांना माहिती आहे असेही पवारांनी म्हटले. मात्र, याच गोष्टीवर आम्हाला आक्षेप असून त्यांनी आपली भूमिका जाहीर करावी. शरद पवार यांनी एकदा गर्वाने सांगावे की ‘गर्व से हम मराठा’ आहे. एकदा घोषणा देऊन टाकावी. एक मराठा लाख मराठा ही घोषणाही द्यावी, म्हणजे तो प्रश्न संपून जाईल, असा टोला राधाकृष्ण विखे पाटलांनी लगावला आहे.

शरद पवार यांनी दिवाळी पाडव्याच्या दिवशी गोविंद बागेत येथून प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझा जातीचा बोगस दाखला व्हायरल झाला होता. माझा इंग्रजीमधील दाखला काही जणांनी फिरवला. त्यावर ओबीसी लिहले होते. जन्माने दिलेली जात मी लपवत नाही. सगळ्या जगाला माहितीय आहे, माझी जात काय आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांच्या जातीचा खोटा दाखला सोशल माध्यमांवर व्हायरल झाला होता, याचबाबत पवारांकडून स्पष्टीकरण देण्यात आले होते. परंतु, मराठा आरक्षणासंदर्भातील या वादात आता नवीन वादाला आणि ते ही शरद  पवार यांच्याशी संबंधित असलेल्या वादाला सुरुवात झाल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -