घरताज्या घडामोडीMSRDC चे एमडी राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ

MSRDC चे एमडी राधेश्याम मोपलवार यांना मुदतवाढ

Subscribe

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (सेवानिवृत्त) राधेश्याम मोपलवार यांना पुन्हा एकदा मुदतवाढ देण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना रूग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर पहिला निर्णय हा राधेश्याम मोपलवार यांच्या सेवा कार्यकाळासाठीच्या मुदतवाढीच्या निमित्ताने झाल्याचे कळते. राधेश्याम मोपलवार यांना करार पद्धतीने तीन महिन्यांची म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधी त्यांना अनेकदा मुदतवाढ मिळाली आहे. आज शासन निर्णयानुसार त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे. याआधीच करारान्वये मोपलवार यांची मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपुष्टात आली होती.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळामार्फत हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा म्हणजे नागपूर ते शिर्डी लवकरच वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. महामार्गावरील वाहतूक सुरक्षेबाबतची कामे अंतिम टप्प्यात असल्याने हा प्रकल्प पूर्ण करण्याच्या निमित्ताने त्यांना ही मुदतवाढ देण्यात आली आहे. पुढील तीन महिन्यासाठी म्हणजे २८ फेब्रुवारीपर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. त्यासाठीचा शासन निर्णय आज जाहीर झाला.

- Advertisement -

मोपलवार हे सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना २८ फेब्रुवारी २०१८ रोजी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर एक वर्षाच्या कालावधीसाठी मुदतवाढ करारान्वये देण्यात आली. त्यानंतर २८ फेब्रुवारी २०१९ रोजी पुन्हा एक वर्षासाठी, २८ फेब्रुवारी २०२० न्वये तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्यात आली. त्यानंतर २८ मे २०२० न्वये एका वर्षासाठी त्यानंतर ४ जूनच्या २०२१ च्या निर्णयानुसार सहा महिन्यासाठी मुदतवाढ शासन निर्णयानुसार देण्यात आली होती.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -