घरमहाराष्ट्र'राफेल करारामध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा'

‘राफेल करारामध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा’

Subscribe

राफेल करारामध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये पृथ्वाराज चव्हाण बोलत होते.

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील राफेल करारावरून सुरू असलेले आरोप – प्रत्यारोप थांबताना दिसत नाहीत. राफेल कराराबद्दल खोटी माहिती देऊन केंद्र सरकारनं जनतेची फसवणूक केली आहे. शिवाय, राफेल करारामध्ये ३६ हजार कोटींचा घोटाळा झाला असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. औरंगाबादमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये पृथ्वाराज चव्हाण बोलत होते. दरम्यान, खरेदीच्या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता आली पाहिजे, त्यावर चर्चा झाली पाहिजे अशी मागणी देखील यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केली आहे. यावेळी दुष्काळाच्या मुद्यावरून देखील पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्य सरकारला लक्ष्य केलं. दरम्यान, पाच राज्याच्या निवडणूक निकालांची प्रचिती लोकसभा निवडणुकीत येणार आहे. ५ राज्यांमधून भाजपाच्या १०० जागा कमी होतील, असा दावा यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. राफेल करारावरून सध्या काँग्रेस आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आरोप – प्रत्यारोप सुरू आहेत.

वाचा – अनिल अंबानीच्या कार्यालयाबाहेर काँग्रेसने लावले ‘राफेल चोर’ पोस्टर

मोदींची गांधी घराण्यावर टिका

राफेल करारावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर ट्विटरवरून जोरदार हल्ला चढवला आहे. बोफर्स तोफ खरेदी प्रकरण आणि ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणाचा हवाला देत मोदींनी यावेळी थेट काँग्रेसवर हल्ला चढवला आहे. राफेल करारामध्ये मामा क्वात्रोची आणि ख्रिश्चयन मिच्छेल नाही अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी गांधी घराणयाला लक्ष्य केलं आहे.

- Advertisement -

वाचा – राफेल घोटाळा : सरकार म्हणतंय ‘ती’ आमची टायपिंग मिस्टेक!

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर देखील काँग्रेस राफेल करारावरून आक्रमक झाली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी जेपीसीच्या चौकशीची मागणी केली. शिवाय, ५ राज्यांच्या निवडणुकीमध्ये देखील राफेल खरेदी प्रकरणावरून भाजप आणि काँग्रेसनं जोरदार हल्ला चढवला होता.

वाचा – राफेल करारावरून मोदींची काँग्रेसवर ट्विट ‘फायर’

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -