घरताज्या घडामोडीरघुनाथ कुचिकांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस, पीडित तरुणीने केले होते...

रघुनाथ कुचिकांची भाजप नेत्या चित्रा वाघ यांना नोटीस, पीडित तरुणीने केले होते गंभीर आरोप

Subscribe

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी शिवसेना नेते रघुनाथ कुचिक बलात्कार पीडित तरुणीला पाठिंबा दिला होता. कुचिक यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी तरुणीला चित्रा वाघ यांनी मदत केली होती. परंतु पीडित तरुणीने चित्रा वाघ यांच्यावरच गंभीर आरोप केले आहेत. चित्रा वाघ यांनीच आपल्याला विशिष्ट प्रकारचा जबाब देण्यासाठी सांगितले असल्याचा आरोप तरुणीने केला आहे. यानंतर आता रघुनाथ कुचिक यांच्या वकिलांकडून चित्रा वाघ यांच्यावर अब्रुनुकसानीची भरपाई द्यावी अशी नोटीस पाठवण्यात आली आहे. हा सगळा योगायोग असल्याची प्रतिक्रिया चित्रा वाघ यांनी या नोटीसवर दिली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांना पुण्यातील शिवसेनेचे उपनेते रघुनाथ कुचिक यांच्या वकिलांनी नोटीस पाठवली आहे. नोटीस मिळाल्याची माहिती चित्रा वाघ यांनी स्वतः दिली आहे. कुचिक यांच्याकडून ३ दिवसांपूर्वी पाठवलेली नोटीस आज मिळाली आहे. बलात्कार प्रकरणात तरुणीने कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या प्रकरणात न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून माझी बदनामी चित्रा वाघ करत आहेत. त्यांनी अब्रुनुकसानीची भरपाई द्यावी. चित्रा वाघ यांनी दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करण्यात आला असल्याचे नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहेत.

- Advertisement -

चित्रा वाघ यांनी नोटीस मिळाल्यानंतर ट्विट केलं आहे. शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कारपिडीतेने काल माझ्यावर आरोप केले कि चित्रा वाघ यांनीचं हे सगळं घडवून आणलं आणि आज सकाळीचं कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली तर दुसरीकडे चित्रा वाघ वर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरू आहेत. हा सगळा निव्वळ योगायोग नाही का ? असा सवाल चित्रा वाघ यांनी केला आहे.

पीडित तरुणीचा चित्रा वाघांवर पलटवार

रघुनाथ कुचिक बलात्कार पीडित तरुणीने भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ यांनीच मला विशिष्ट जबाब देण्यास भाग पाडले होते. आपल्याला गोव्यात आणि मुंबईत चित्रा वाघ यांच्या मदतीने डांबून ठेवण्यात आलं होते. याशिवाय चित्रा वाघ यांनी पोलिसांना फक्त विशिष्ठ घटना सांगायला भाग पाडलं महंम्मद अहमद अंकल उर्फ चाचा आणि चित्रा वाघ यांनी हे प्रकरण सगळं तयार केले असल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : होय, मी बैल खायचो; जितेंद्र आव्हाडांच्या विधानानं वाद उद्भवणार

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -