घरमहाराष्ट्रराज्यातील मल्लांमध्ये गुणवत्ता, परंतू मॅटवरील कुस्तीकडे लक्ष हवे - राहुल आवारे

राज्यातील मल्लांमध्ये गुणवत्ता, परंतू मॅटवरील कुस्तीकडे लक्ष हवे – राहुल आवारे

Subscribe

कझाकीस्तान येथे पार पडलेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत राहुल आवारे याने कांस्य पदक पटकावले आहे. यानिमित्ताने पुणे श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालापात राहुल आवारे याने मनोगत व्यक्त केले. स्वर्गीय हिंदकेसरी हरीश्चंद्र बिराजदार, अर्जुन पुरस्कार विजेते काका पवार यांच्यासह आई वडीलांना हे पदक अर्पण करत असल्याचे नमुद करत राहुलने कुस्तीविषयीची मते मांडली. यावेळी संघाचे अध्यक्ष प्रसाद कुलकर्णी, सरचिटणीस चंद्रकांत हंचाटे आणि खजिनदार सुनील जगताप उपस्थित होते.

जागतिक कुस्ती स्पर्धेत मला कांस्य पदक मिळाले असले तरी भविष्यात या पदकाचा रंग वेगळा असेल, असा विश्वास आंतरराष्ट्रीय मल्ल राहुल आवारे याने व्यक्त केला आहे. तसेच महाराष्ट्रातील कुस्तीगीरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी उंचाविण्यासाठी धोरण आखण्याची गरजही त्याने व्यक्त केली.

- Advertisement -

दिल्ली, हरियाणा या राज्याने मॅटवरील कुस्तीला प्रोत्साहन दिले आहे. कुस्तीबाबत त्यांचे धोरण निश्चित आहे. त्यामुळे तेथील कुस्तीगीरांची आंतरराष्ट्रीय पातळीवर चांगली कामगिरी होत आहे. सुशीलकुमारने ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळवून कुलुपाची चावी उघडली आहे. यामुळे देशातील इतर कुस्तीगीरांनाही आपण पदक मिळवू शकतो. असा आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
– राहुल आवारे, कुस्तीपटू

महाराष्ट्रातील मल्लांमध्ये गुणवत्ता आहे. परंतु मॅटवरील कुस्तीकडे अधिक लक्ष दिले पाहीजे, असे मत व्यक्त करत राहुल याने राज्य सरकारने त्यासाठी धोरण ठरवण्याची गरज असल्याचे नमूद केले. मी स्वत:ला ओळखण्यात कमी पडलो, नाही तर हे पदक मी पाच वर्ष आधीच पटकावले असते. ऑलिम्पिक पदक हे माझे पुढील ध्येय आहे, असेही त्याने सांगितले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -